भरगर्दीत तरुणीनं हात पकडून ओढलं अन्...; हॉटेलमध्ये जाताना अभिषेक शर्मासोबत घडला धक्कादायक प्रकार

Fan Misbehaves with Abhishek Sharma In Hotel: सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Fan Misbehaves with Abhishek Sharma In Hotel:
Abhishek Sharma surrounded by fans outside Jaipur hotel moments before a fan grabbed his hand in a viral incident.saam tv
Published On
Summary
  • जयपूरमध्ये अभिषेक शर्मासोबत धक्कादायक घटना

  • चाहतीने गर्दीत हात पकडून ओढण्याचा प्रयत्न

  • हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप केला

आयपीएलच्या 36व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सलाला पराभूत करत शानदार विजय मिळवला. या विजयात अभिषेक शर्माची भूमिका महत्त्वाची ठरली. 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 57 धावांची झंझावाती खेळी केली. सामन्यानंतर हैदराबादचा संघ जयपूरच्या हॉटेलमध्ये परतला. त्यावेळी अभिषेक शर्मासोबत धक्कादायक प्रकार घडला.

Fan Misbehaves with Abhishek Sharma In Hotel:
IPL Points Table: आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पराभवानंतर राजस्थानला बसला फटका,अव्वलस्थानी असणाऱ्या पंजाबचं काय झालं?

तिने सगळ्यांसमोर हात खेचला अन्....;

हॉटेलमध्ये उभी असलेल्या एका मुलीने अचानक अभिषेकचा हात पकडला. त्यानंतर त्याला आपल्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अचानक घडल्याने अभिषेक काही क्षण गोंधळून गेला. मात्र त्याने लगेच स्वतःला सावरले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच हस्तक्षेप करत त्या मुलीपासून अभिषेकचा हात सोडवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Fan Misbehaves with Abhishek Sharma In Hotel:
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा जलवा, शतक ठोकून रचला मोठा इतिहास, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

खेळाडू हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा तयार होत असतो. खेळाडू जाणार त्या मार्गाच्या आजुबाजुला चाहते फोटो किंवा सेल्फी घेण्यासाठी उभे असतात. त्यादरम्यान संधी मिळाली की ते आपल्या आवडत्या क्रिकेटरसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. जयपूरच्या हॉटेलमध्येही ही मुलगीही फोटो घेण्यासाठी उभी होती. हैदराबाद संघाचा खेळाडू अभिषेक शर्मा दिसताच तिने अचानक त्याचा हात पकडला आणि त्याला ओढण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड देखील तिथे उपस्थित होता. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान शनिवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयात ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्यानी झालेल्या दुसऱ्या विकेटसाठीच्या धावांच्या भागीदारीचा मोठा वाटा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com