IPL 2026 मध्ये CSKवर काळी जादू? थेट BCCIकडे तक्रार; व्हायरल व्हिडिओ आणि पत्राचं सत्य काय?

Black Magic In IPL: सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यानंतर, एक व्हिडिओ आणि एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Black Magic In IPL:
A viral video and letter claim ‘black magic’ in IPL 2026 after CSK vs SRH matchsaam tv
Published On
Summary
  • CSK vs SRH सामन्यानंतर ‘काळी जादू’चा दावा चर्चेत

  • सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे वाद

  • बीसीसीआयकडे तक्रार केल्याचा दावा, पण पुष्टी नाही

खेळाडू आपल्या संघाला आयपीएल जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. खेळाडूंप्रमाणेच चाहतेदेखील आपल्या संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. यात काही जण उपवास करतात, तर काही जण आपली केशभूषा बदलतात. पण आपल्या आवडत्या संघाला जिंकवण्यासाठी चाहते काळी जादू करतात? असा प्रश्न आता अनेकांकडून केला जात आहे.

त्याच कारण म्हणजे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यात हैदराबाद संघाचा एक चाहता लिंबू मंतरताना दिसतोय. याबाबत बीसीसीआयकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा केला जातोय.

कोणत्या सामन्यात घडली काळी जादू? कोणी तक्रार केली?

१८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात एक सामना खेळला गेला. यात हैदराबादनं १० धावांनी विजय मिळवला.या सामन्यात सीएसके चांगल्या लयीत दिसत होती, पण अचानक त्यांच्या विकेट्स पडू लागल्या आणि संघ हरला. सामना संपल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे खळबळ उडाली.

कारण यात एक प्रेक्षक लिंबू फिरवताना दिसतोय. लिंबू डोळ्यापुढे घेऊन काही मंत्र उच्चारताना दिसतोय. त्यामुळे सीएसकेच्या संघावर काळी जादू झाल्याचा म्हटलं जातंय. यामुळे संघाला हैदराबाद विरुद्धात पराभूत झाली. आता याप्रकरणी सीएसकेकडून बीसीसीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली असल्याचा दावा केला जातोय.

आधी व्हिडिओ व्हायरल झाला आता तक्रारीचे पत्र व्हायरल

हैदराबाद स्टेडियमवर एसआरएचची जर्सी घालून सामना पाहणाऱ्या एका चाहत्याने हा व्हिडिओ काढला होता. त्यात तो चाहता हातात लिंबू घेऊन काहीतरी बोलताना दिसतोय. नंतर त्यात फुंकर मारून मैदानाकडे बोट दाखवताना दिसतो. व्हिडिओमध्ये पुढे असेही दिसते की, एसआरएचच्या चाहत्याच्या त्या कृतीनंतर लगेचच सीएसकेचा फलंदाज शिवम दुबे त्रिफळाचीत होतो. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर एक पत्रही व्हायरल झाले आहेत. जे चेन्नई सुपर किंग्जने बीसीसीआयकडे केलेली तक्रार असल्याचा दावा केला जातोय. चेन्नईने मैदानावर सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांवर संघाला हरवण्यासाठी काळी जादू केल्याचा आरोप केला. अशी हैदराबाद संघाबद्दल बीसीसीआयकडे तक्रार करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या दाव्यांमागे सत्य काय?

आधी आपण व्हिडिओबद्दल सत्य जाणून घेऊ. या व्हिडिओमध्ये दाखवलेली चाहत्याची कृती खरी आहे. तसेच फलंदाज बाद होण्याची घटनाही खरी आहे. मात्र हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. जणू काही काळ्या जादूने विकेट पडली आहे, असे भासवण्यासाठी दोन वेगवेगळे व्हिडिओ एकत्र करण्यात आला आहे.

सीएसकेच्या नावाने व्हायरल झालेले पत्रही बनावट आहे. फ्रँचायझीने बोर्डाकडे अशी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाहीये. हे बनावट पत्र सीएसकेची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. कारण अलीकडेच चेन्नईने बंगळूरु स्टेडियममधील डीजेबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली होती. याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com