
RCB VS KKR : आयपीएल २०२५ च्या सलामी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेते कोलकाता नाईट रायडर्सवर ७ गडी राखत विजय मिळवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये केकेआरला रोखून ठेवले. दुसऱ्या इनिंगमध्ये रजत पाटीदार, फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी बंगळुरुचा विजय निश्चित केला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुढे केकेआरचे फलंदाज मैदानात उतरले. अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी दमदार खेळी केली. दोघे बाद झाल्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी केकेआरवर दबाव टाकला. कोलकाताच्या संघाने २० ओव्हर्समध्ये एकूण १७४ धावा केल्या.
दुसऱ्या इनिंगमध्ये बंगळुरूचे सलामीवीर फिल सॉल्ट आणि विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरले. फिल सॉल्टने दमदार ५६ धावा केल्या. त्यानंतर आलेला देवदत्त पडिक्कल १० धावा करुन स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने सावध खेळी करत १६ बॉल्समध्ये ३४ धावा केल्या. विराट कोहलीने देखील अर्धशतकीय खेळी केली.
आयपील २०२५ ची सुरुवात गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खेळला गेला. दोन्ही संघाचे नवे कर्णधार पहिल्याच सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरले. पण आजच्या सलामी सामन्यामध्ये बंगळुरूचे पारडे भारी पडले. आरसीबीने ७ गडी राखून केकेआरवर विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.