
इंडियन प्रिमीयर लीगमध्ये आज ६३ वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. यामधून आज एक टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय करणार आहे. त्यामुळे या दोन्ही टीम्ससाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा मानला जातोय.
मात्र दोन्ही टीमच्या खेळाडूंसाठी आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येते. हवामान खात्याने या सामन्यादरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत जर मुंबई विरूद्ध दिल्ली यांच्यामधील सामना होऊ शकला नाही तर कोणत्या टीमला फायदा होणार हे पाहूयात.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिट्लस आमनेसामने येणार आहे. या सामन्यादरम्यान हवामान विभागाने ८५ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हा सामना खेळवला गेला नाही तर कसं समीकरण असणार आहे त्यावर एक नजर टाकूयात.
जर पावसामुळे हा सामना रद्द झाला तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीम्ससाठी हे समीकरण कठीण असणार आहे. कारण या दोन्ही टीम्ससाठी पंजाब किंग्जविरूद्ध एक-एक सामना खेळण्याची संधी आहे. हा सामना सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होणार आहे. यामध्ये सामना रद्द झाल्यास मुंबईला जास्त फायदा होणार आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या खात्यात अधिक गुण आहेत.
सध्या मुंबई इंडियन्सची टीम १४ पॉईंट्सह चौथ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात पावसाने खेळ केला तर मुंबईचे १५ पॉईंट्स होणार आहे. अशामध्ये जरी मुंबई पुढच्या सामन्यात पंजाबकडून हरली तरी तिला क्वालिफाय करण्याची संधी मिळू शकते. कारण त्यांचं रनरेट अधिक आहे.
आजच्या सामन्यातील पावसाचा खेळ हा दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगला ठरणार नाही. जर आजचा सामना रद्द झाला तर दिल्लीची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी हुकली जाऊ शकते. यानंतर जर दिल्ली पुढच्या सामन्यात पंजाबचा पराभव करते तर त्यांच्या खात्यात १६ पॉईंट्स होतात. मात्र रनरेटच्या हिशोबाने मुंबई वरचढ ठरेल. कारण दिल्लीचं सध्याचं नेट रनरेट +0.260 आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.