IPL 2025 : 3 संघांमध्ये थरारक लढत, Mumbai Indians ला कसं मिळणार प्लेऑफचं तिकीट? जाणून घ्या समीकरण

MI Playoff Scenario IPL 2025 : गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे तीन संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता शेवटच्या चौथ्या जागेसाठी मुंबईसह ३ संघांमध्ये लढत आहे.
MI Playoff Scenario
MI Playoff ScenarioX
Published On

गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे तीन संघ प्लेऑफसाठी पात्र झाले. पॉईंट्स टेबलवर गुजरात पहिल्या, बंगळुरू दुसऱ्या, तर पंजाब तिसऱ्या क्रमावर आहे. आता प्लेऑफमधील चौथ्या जागेसाठी मुंबई, दिल्ली आणि लखनऊ यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या तीन संघांमध्ये लढत आहे. यातील मुंबईचा संघ १८ गुण मिळत प्लेऑफमध्ये जाऊ शकतो. बुधवारी (२१ मे) रोजी मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना रंगणार आहे. दोघांपैकी एकच संघ १७ किंवा त्यापैक्षा जास्त गुण मिळवू शकतो.

MI Playoff Scenario
Corona वाढतोय, मुंबईत आढळले ८ कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण!

मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्या विरुद्धचे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. दोन विजयांमुळे मुंबईची स्थिती अधिक भक्कम होईल. मुंबईने दिल्लीचा पराभ केल्यास दिल्ली प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. जर दिल्लीचा विजय झाला. तर मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी काहीकरुन पंजाब विरुद्धचा सामना जिंकावा लागेल.

MI Playoff Scenario
प्रसिद्ध अभिनेत्रीला Covid-19 ची लागण, सोशल मीडियावर शेअर केली धक्कादायक माहिती

लखनऊला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी तिन्हीही सामने जिंकावे लागतील. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांनी १६ किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळाले, तर लखनऊला प्लेऑफमध्ये पोहोचेल. बुधवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यावरुन प्लेऑफमध्ये कोणता चौथा संघ जाणार हे निश्चित होईल.

MI Playoff Scenario
Pune News : डिलिव्हरी बॉय म्हणून फिरायचा, संधी साधून मंगळसूत्र चोरायचा, एक चूक केली अन् तुरुंगात गेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com