Pune News : डिलिव्हरी बॉय म्हणून फिरायचा, संधी साधून मंगळसूत्र चोरायचा, एक चूक केली अन् तुरुंगात गेला

Pune Police News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र अज्ञात तरुणाने हिसकावून चोरुन नेले. पुणे पोलिसांनी १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला फक्त १२ तासात ताब्यात घेतले.
Pune Police
Pune PoliceSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी १२ तासात जेरबंद केले आहे. कुणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून वावरत होता. आरोपीकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे २ तोळे सोने आणि एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमोल नाकते असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादी महिला हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिरा जवळ धनकवडी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी एका दुचाकी वरुन आलेल्या अनोळखी तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले.

Pune Police
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, डंपर अचानक राँग साईडला गेला, पिकअपला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावरून गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून फिरत असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीचा शोध घेत हा तरुण आंबेगाव पठार येथे कोणाची तरी वाट पाहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी तात्काळ धाव घेतली. पोलिस येताच त्याने तिथून पळ काढला. पोलिसांनी त्याच्या मागे जात त्याला ताब्यात घेतले.

Pune Police
Pune News : 'भाई होण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा', पुणे पोलिसांचा गावगुंडांना सज्जड दम

चौकशी दरम्यान, त्याने या गुन्ह्याची कबुली देऊन 'मी सकाळी दुचाकी गाडीवरून आंबेगाव पठार धनकवडी भागात स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून फिरण्याचा बहाणा करीत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती त्या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून मी तेथून पळून गेलो' असे सांगितले. आरोपीकडून ९० हजार रूपये किंमतीचे २ तोळे सोने व गुन्हा करतेवेळी वापर केलेली एक दुचाकी गाडी व सोने गहाण ठेवून मिळालेली १ लाख रुपये रक्कम असा एकूण २ लाख ५० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

Pune Police
Pune News : हुंड्यासाठी छळ अन्...; अजितदादांच्या बड्या नेत्याच्या सुनेनं जीवन संपवलं, पुण्यातील NCP चा शिलेदार कारवाईच्या भोवऱ्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com