प्रसिद्ध अभिनेत्रीला Covid-19 ची लागण, सोशल मीडियावर शेअर केली धक्कादायक माहिती

Corona News : सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये करोना झपाट्याने वाढत आहे. भारतातही करोनाचे रुग्ण आढळले आहेत. आता प्रसिद्ध अभिनेत्रीने कोव्हिड पॉझिटीव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली आहे.
Corona
CoronaX
Published On

करोनाच्या संकटाने पुन्हा एकदा डोकं वर काढलयं. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये करोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या दोन्ही शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा करोना लाटेचा धोका निर्माण झालाय. भारतातही करोनाने पुन्हा शिरकाव केल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत करोनाचे ८ रुग्ण आढळले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. हेल्थ अपडेट दिल्यानंतर शिल्पा यांचे चाहते चिंतेत आहेत. हिंदी बिग बॉस १८ मध्ये शिल्पा शिरोडकर झळकल्या होत्या. त्या टॉप स्पर्धकांपैकी एक होत्या. बिग बॉस १८ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धेकांपैकी एक होत्या.

Corona
Pune News : डिलिव्हरी बॉय म्हणून फिरायचा, संधी साधून मंगळसूत्र चोरायचा, एक चूक केली अन् तुरुंगात गेला

'नमस्कार मंडळी! मला करोनाची लागण झाली आहे. सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि मास्क घाला, तुमची शिल्पा शिरोडकर'... असे शिल्पा शिरोडकर यांच्या पोस्टमध्ये लिहिलेले आहे. चाहत्यांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन शिल्पा यांनी सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनद्वारे केले आहे. चाहत्यांनी पोस्टखाली कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे.

Corona
“बाई आणि बाटली या दोन गोष्टींपासून दूर राहायचं”, प्रसिद्ध अभिनेत्याने लेकाला दिला सल्ला

आयपीएलमध्येही करोनाचा शिरकाव

भारत-पाकिस्तान तणावानंतर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. स्थगितीनंतर १७ मे रोजी आयपीएलला पुन्हा सुरुवात केली. सनरायजर्स हैदराबाद संघाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोव्हिड-१९ ची लागण झाली आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर तो मायदेशी म्हणजेच ऑस्ट्रेलियाला परतला होता. तेव्हा हेडला करोनाची लागण झाली.

Corona
IPL 2025 : गुजरात टायटन्सच्या विजयामुळे ३ संघ झाले क्वालिफाय, दिल्लीच्या पराभवाने मुंबईचा फायदा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com