IPL 2025
IPL 2025 Points Table Punjab Kingssaam

IPL 2025 Points Table: गुजरातकडून RCBचा दारूण पराभव; पण 'किंग' ठरला पंजाबचा संघ, जाणून घ्या सारं गणित

IPL 2025 Points Table Punjab Kings: आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यातील पराभवामुळे RCB संघाचं मोठं नुकसान झालंय. पंजाब किंग्स मात्र 'हिरो' ठरलाय. नेमकं काय आहे पॉइंट्स टेबलचं गणित ते जाणून घेऊ.
Published on

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा दारूण पराभव झाला. गुजरात टायटन्सच्या संघाने ८ विकेट राखत आरसीबीची विजयी घोडदौड थांबवली. मात्र आरसीबीच्या एका पराभवामुळे आरसीबीचं मोठं नुकसान झालंय. पॉइंट् टेबलमध्ये आरसीबीची घसरगुंडी झालीय. तर गुजरातचा विजय झाल्यामुळे गुजरात टायटन्सने आता चार पॉइंट्सची कमाई केली आहे. पण सगळ्यात मोठा फायदा हा पंजाब किंग्स संघाला झालाय.

पंजाब किंग्स संघ पहिल्या, तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर

आपण इंडियन प्रीमियर लीगच्या ताज्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर आता पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि गुजरात टायटन्स या संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत पंजाब किंग्सचा संघ सरस ठरलाय. त्यामुळे पंजाबचा संघ पॉइंट्स टेबलवर पहिल्या क्रमांकावर आहे. तर आरबीसीच्या पराभवाचा फायदा दिल्ली कॅपिटल्सलाही झालाय. हा संघ पॉइंट्स टेबलवर आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.

 IPL 2025
GT vs RCB: सिराजशी पंगा ना लेना! आधी ठोकला १०५ मीटरचा षटकार, नंतर उडला सॉल्टचा त्रिफळा

६ संघांचे प्रत्येकी दोन गुण

मुंबई इंडियन्स, एलएसजी, सीएसके, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि केकेआर संघांना समान गुण आहेत. म्हणजेच या सर्व संघांनी आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकलाय. सध्या सर्व संघांनी किमान एक तरी सामना जिंकलाय.

मुंबई इंडियन्सचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे, तर सर्वात वाईट नेट रनरेटमुळे, KKR संघ दहाव्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर पोहोचलाय. येत्या काही दिवसांत गुणपत्रिकेत आणखी बरेच बदल पाहायला मिळतील. कोणताही संघ कोणत्याही स्थानी असला तरी प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट्स तालिकेत चढ-उतार होत असतात. आता आयपीएल अशा टप्प्यावर आहे जिथे प्रत्येक सामना खूप महत्वाचा आणि रोमांचकारी असणार आहे.

 IPL 2025
RCB vs GT IPL 2025: बटलरची किलर फलंदाजी; RCBचा उडवला धुव्वा, ८ विकेट राखून गुजरातचा मोठा विजय

आरसीबीचा दारुण पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभव स्वीकारावा लागलाय. गुजरात टायटन्स संघाने १८ व्या षटकातच आरसीबीचे १७० धावांचे लक्ष्य गाठले. आरसीबी या मोसमातील पहिला सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत होती. पण यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने ८ गडी गमावून १६९ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com