RCB vs GT IPL 2025: बटलरची किलर फलंदाजी; RCBचा उडवला धुव्वा, ८ विकेट राखून गुजरातचा मोठा विजय

IPL च्या १४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातच्या संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दमदारपणे करत रॉयल चॅलेंजर्ज बंगळुरुला पराभूत केलं.
RCB vs GT IPL 2025: बटलरची किलर फलंदाजी; RCBचा उडवला धुव्वा, ८ विकेट राखून गुजरातचा मोठा विजय
Published On

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात जोस बटलरने तुफानी कामगिरी केली. त्याने ३९ चेंडूंचा सामना करत नाबाद ७३ धावा केल्या. बटलरच्या या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. रदरफोर्डने नाबाद ३० धावा केल्या.

तर साई सुदर्शनने ४९ धावांची शानदार खेळी केली. गुजरात टायटन्सची पहिली विकेट शुभमन गिलच्या रूपाने पडली. गिल १४ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गुजरातची दुसरी मोठी विकेट साई सुदर्शनच्या रुपाने पडली.

साई सुदर्शनच्या विकेटनंतर जोस बटलर आणि रदरफोर्डने धमाकेदार फलंदाजी केली. जोस बटलरने धमाकेदार फलंदाजी करत ३९ चेंडूंत नाबाद ७३ धावा केल्या. बटलरच्या या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजुला रदरफोर्डने नाबाद ३० धावा केल्या.

RCB vs GT IPL 2025: बटलरची किलर फलंदाजी; RCBचा उडवला धुव्वा, ८ विकेट राखून गुजरातचा मोठा विजय
BCCI कडून टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर; अडीच महिन्यात १२ सामने खेळणार भारतीय संघ

चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करणारा संघ सर्वाधिक वेळा सामना जिंकलाय. या स्टेडियमच्या इतिहासानुसार,नाणेफेक जिंकणारा संघाने पुन्हा एकदा सामना आपल्या नावावर केलाय. जो संघ प्रथम गोलंदाजी करतो त्या संघाला आव्हानाचा पाठलाग करणं सोपं जातं. आजच्या सामन्यातही तसेच झाले.

घरच्या मैदानात खेळणाऱ्या आरसीबीने नाणेफेक गमावली. टॉस जिंकलेल्या गुजरातने आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रण दिलं. यंदाच्या मोसमात फॉर्मवर असलेला आरसीबीचा संघ आज ऑऊट फॉर्ममध्ये दिसला. सुरुवातीची तीन विकेट लवकर पडल्याने आरसीबीचा संघ काही बॅकफूटवर गेला होता.

RCB vs GT IPL 2025: बटलरची किलर फलंदाजी; RCBचा उडवला धुव्वा, ८ विकेट राखून गुजरातचा मोठा विजय
IPL 2025: राजस्थान रॉयल्सनं कर्णधार बदलला; 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात पंजाबशी भिडणार संघ

आरसीबीकडून लिव्हिंगस्टनने अर्धशतक झळकावले. लिव्हिंगस्टनने ५४ धावांची तुफान फटकेबाजी केली. टीम डेव्हिडने १८ चेंडूत ३२ धावा केल्या. त्यानंतर जितेश शर्माने ३३ धावांचे योगदान दिलं. या तिघांच्या धमाकेदार खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १६९ल धावा केल्या होत्या. गुजरातकडून सिराजने ४ षटकांत १९ धावा देत ३ बळी घेतले. साई किशोरने ४ षटकात २२ धावा देत २ बळी घेतले. अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.

आरसीबीची निराशाजनक कामगिरी

प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात खूपच खराब राहिली. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज लवकर माघारी आले. डावाच्या दुसऱ्याच षटकात विराट कोहलीच्या रुपाने आरसीबीला पहिला धक्का बसला. कोहली ७ धावा करून बाद झाला. त्याला अर्शद खानने बाद केले. यानंतर तिसऱ्या षटकात देवदत्त पडिकलने तंबूचा रस्ता पकडला.

मागच्या सीझनमध्ये आरसीबीकडून खेळणारा सिराज आता गुजरातकडून खेळत आहे. सिराजने पडिकलला बोल्ड केले. त्यानंतर सिराजनेच पाचव्या षटकात स्फोटक फलंदाज फिल सॉल्टला माघारी तंबूत पाठवले. इशांतने सातव्या षटकात कर्णधार रजत पाटीदारला बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com