
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी मोठी बातमी आहे. संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन तंदुरुस्त होऊन परतलाय. पंजाबविरुद्धच्या सामन्यात तो राजस्थान संघाचं नेतृत्त्व करणार आहे. संजू पहिल्या तीन सामन्यांमध्ये इम्पॅट खेळाडू म्हणून खेळला. यावेळी त्याने फलंदाजीत महत्त्वाचे योगदान दिले. संजूच्या अनुपस्थितीत रियान पराग राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. राजस्थानने गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत विजयाचे खाते उघडले होते.
पहिल्या तीन सामन्यांमध्ये प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळणारा संजू सॅमसन कर्णधार म्हणून संघात परतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संजू सॅमसंग पंजाबविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचे नेतृत्व करताना दिसेल. संजूच्या अनुपस्थितीत रियान पराग पहिल्या तीन सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळताना दिसला.
राजस्थानला आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तर संघाला केवळ एकच सामना जिंकता आलाय. सॅमसनचे कर्णधारपदी पुनरागमन ही राजस्थान रॉयल्ससाठी दिलासादायक बातमी आहे.
सलग दोन सामने गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवून आपले खाते उघडले. गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १८२ धावा केल्या होत्या. संघाच्या वतीने नितीश राणाने शानदार फलंदाजी करत ३६ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी केली होती. नितीशने आपल्या खेळीत १० चौकार आणि ५ षटकार मारले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेला ६ गडी गमावून केवळ १७६ धावा करता आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.