RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की गुजरात टायटन्स कोण मारणार बाजी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड अन् संभाव्य प्लेइंग-११

IPL 2025 Royal Challengers Bangalore Or Gujarat Titans: बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघ दमदार आहेत पण आजचा सामना कोण जिंकणार? हे जाणून घेण्यासाठी दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड बघावा लागेल.
RCB vs GT:
IPL 2025 Royal Challengers Bangalore Or Gujarat Titanssaam tv
Published On

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाची आज बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध लढत होईल. या मैदानावर RCB आणि GT चे संघ दोनदा आमनेसामने आलेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय. दरम्यान आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. त्या दोन्ही सामन्यात त्यांना विजय मिळालाय. त्यामुळे घरच्या मैदानात खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

परंतु आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकेल हे सांगणे जरा कठीण आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर, त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वरचष्मा दिसतोय. त्याशिवाय यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आजचा सामना त्यांच्या घरच्या मैदानात होत आहे. आरसीबी घरच्या मैदानावर पहिला सामना खेळतेय. त्यामुळे ते चाहत्यांना विजयाचं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतील.

RCB vs GT:
IPL 2025 LSG vs PBKS: अप्रतिम! बिश्नोई-बदोनीच्या जोडीची कमाल,बाउंड्रीवर टिपला उत्कृष्ट झेल|Video Viral

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली या संघाने यंदाच्या हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केलीय. आरबीसीचा संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. तर आज आरसीबीसमोर दंड थोपटणारा गुजरातचा संघ मात्र बेहाल झालेला दिसतोय. यंदाच्या आयपीएल सीझनची सुरुवात त्यांच्यासाठी चांगली झाली नाही. गुजरातच्या संघाला त्यांच्याच घरात पराभवाला सामोरे जावे लागलंय.

RCB vs GT:
IPL 2025 Points Table: लखनऊला पंजाबने पराभूत केलं; मुंबई इंडियन्सला मोठा फायदा, नेमकं काय घडलं? वाचा....

पंजाब किंग्सविरुद्ध सामन्यात त्यांचा ११ धावांनी पराभव झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २४३ धावा केल्या. यात श्रेयस अय्यर, प्रियांश आर्य आणि शशांक सिंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पंजाबने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. परंतु संपूर्ण संघ २३२ धावांवरच मर्यादित राहिला. त्यामुळे गुजरातचा ११ धावांनी पराभव झाला होता.

मात्र मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात गुजरातला विजय मिळाला होता. त्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १६० धावा करू शकला. यामुळे गुजरातने मुंबईविरुद्धचा सामना ३६ धावांनी जिंकला.

RCB vs GT:
Flaying Jatt बनला अर्शदीप; हवेत फिरला चेंडू अन् जाळ्यात अडकला मिचेल मार्श, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

RCB vs GT: दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊ. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण ५ सामने झालेत. या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वरचष्मा राहिलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सविरुद्ध ३ सामने जिंकलेत. तर २ सामन्यात गुजरातचा विजय झालाय. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यांवर नजर टाकली तर, दोन्ही संघांमध्ये एकूण २ लढती झाल्या आहेत. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सने १-१ सामना जिंकलाय.

RCB vs GT: संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

तर इम्पॅट प्लेअर - सुयश शर्मा असेल.

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.

तर इम्पॅट प्लेअर - महिपाल लोमरोर असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com