IPL 2024 Auction: मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला संघात का घेतलं? खरं कारण आलं समोर...

Hardik Pandya IPL 2024: रोहितसारखा चाणक्ष कर्णधार संघात असतानाही मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या संघात स्थान का दिले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
IPL 2024 why did mumbai indians take hardik pandya in the team know the real reason
IPL 2024 why did mumbai indians take hardik pandya in the team know the real reasonSaam TV
Published On

IPL 2024 Mumbai Indians Team

आयपीएल 2024 स्पर्धा आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच फ्रेंचायझींनी आपल्या संघात महत्वाचे बदल केले आहेत. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रिटेन केले आहे. याशिवाय काही खेळाडूंना रिलीज देखील केलं आहे.

महत्वाची बाब म्हणजे मुंबईने आपल्या संघात गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा हुकमी एक्का हार्दिक पंड्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं आहे. मुंबईने हार्दिक पंड्यासाठी १५ कोटी रुपयांची रक्कम मोजली आहे.

IPL 2024 why did mumbai indians take hardik pandya in the team know the real reason
Horoscope Today: चंद्राचा कन्या राशीत प्रवेश, या राशींच्या आयुष्यात होणार मोठा उलटफेर

हार्दिकच्या अचानक एन्ट्रीमुळे मुंबई इंडियन्सचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. रोहितसारखा चाणक्ष कर्णधार संघात असतानाही मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या संघात स्थान का दिले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. (Latest sports updates)

तसं पाहता गुजरात टायटन्सचा संघ हार्दिक पंड्याला सोडायला तयार नव्हता. त्यामागचं कारणही तसंच आहे. हार्दिक हा गुजरातच्या संघाचा कर्णधार होता. त्याने गुजरातचे नेतृत्व करताना संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकवून दिले होते.

इतकंच नाही, तर मागील हंगामात गुजरातला फायनलमध्येही पोहचवले होते. त्यामुळे गुजरातच्या संघाने यंदाही हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) रिटेन केले होते. पण मुंबई इंडियन्समध्ये जायचंच हे हार्दिक पंड्याने मनाशी पक्कं ठरवलं होतं. त्यामुळे गुजरातच्या संघाला त्याच्यावर अधिक दडपण टाकता आले नाही.

मुंबई इंडियन्स हार्दिकला संघात का घेतलं?

हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा टी-२० कर्णधार आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार आपल्या संघात असावा, असं मुंबई इंडियन्सच्या संघाला वाटलं असेल.

याशिवाय रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर पुढचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने धुरा सांभाळावी, असंही संघ व्यवस्थापनाला वाटलं असेल. मुंबई इंडियन्सचा संघ हा काळाची पावले ओळखणारा संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच त्यांनी हार्दिकला संघात घेतलं असेल.

IPL 2024 why did mumbai indians take hardik pandya in the team know the real reason
Who Is Mallika Sagar: यंदाच्या IPL लिलावात दिसणार मल्लिका! BCCI सोपवणार मोठी जबाबदारी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com