वर्ल्डकप संघात स्थान मिळताच स्टार खेळाडूची सुपरफ्लॉप कामगिरी!ठरला राजस्थानच्या पराभवाचं कारण

SRH vs RR: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये गुरुवारी रोमांचक सामना रंगला. या सामन्यामध्ये हैद्राबादच्या संघाने रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यादरम्यान राजस्थानचा एक खेळाडू त्यांच्या संघासाठी महाग ठरला आहे.
ipl 2014
ipl 2014Canva

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये गुरुवारी अटी-तटीचा सामना पहायला मिळाला. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात आला. या सामन्यादरम्यान राजस्थानचा एक खेळाडू त्यांच्याचं संघाला नुकसानदायक ठरला. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सला पराभव स्वीकारावा लागला. हैदराबाद विरुद्ध सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू चहलने त्याच्या गोलंदाजीच्या ४ षटकात एकही गडी बाद न करता ६२ धावा दिल्या.

ipl 2014
SRH vs RR, IPL 2024: हैदराबाद- राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

राजस्थान रॉयल्ससाठी युझवेंद्र चहल या सामन्यादरम्यान सर्वाधिक धावा देणारा खेळाडू ठरला. त्याची गोलंदाजी हैदराबादच्या संघासमोर फारशी काही चांगली दिसली नाही. मात्र, त्याची कामगिरी टी-20 विश्वचषकाआधी समोर येईल अशी कोणालाच वाटलं नव्हतं. टी-20 विश्वचषक २०२४साठी भारताच्या संघाने युजवेंद्र चहलचा संघात समावेश करण्यात आला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चहलची गोलंदाजी फारशी आक्रमक दिसली नाही. त्याच्या खराब गोलंदाजीचा फायदा घेत हैदराबादच्या संघाने २०१ धावांचे लक्ष गाठले. त्याच्या खराब कामगिरीचा फटका त्याच्या संघाला बसला.

युजवेंद्र चहलचा २०२४च्या विश्वचषकाच्या संघात संधी दिली आहे. चहलच्या २०२४च्या कामगीरीविषयी बोलायचे, तर त्याने या हंगामात एकूण १० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १३ विकेट्स आहेत.

युझवेंद्र चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १५५ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्यांनी २०० गडी बाद केले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक म्हणजेच २०० गडी बाद करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. राजस्थानच्या संघाचे अजून सामने बाकी आहेत. चहल त्याच्या आक्रमक गोलंदाजीने आयपीएल २०२४मध्ये काय कमाल करणार हे पाहणे रंजक ठरेल.

ipl 2014
Cricket Records: वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com