RR vs MI Pitch Report: मुंबई की राजस्थान कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024: RR vs MI Match Head To Head Record And Pitch Report | आयपीएल २०२४ स्पर्धेत आज ३८ व्या सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
RR vs MI Pitch Report: मुंबई की राजस्थान कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
Rajasthan Royals Vs Mumbai Indians Match: Head To Head Record, Pitch Report, And Match Prediction In Marathitwitter

IPL 2024 RR vs MI Pitch Match Prediction

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज ३८ व्या सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ज पाहिला तर , दोन्ही संघ २९ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाने १५ सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघाला १३ सामने जिंकता आले आहेत. यादरम्यान एक सामना अनिर्णित राहिला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना २१४ धावा ही मुंबई इंडियन्स संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाची सर्वोच्च धावसंख्या २१२ आहे.

RR vs MI Pitch Report: मुंबई की राजस्थान कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
KKR vs RCB, IPL 2024: पराभवासोबतच फाफ डू प्लेसिसला आणखी एक मोठा धक्का! BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

तसेच या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ या मैदानावर ८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघाने ६ वेळेस बाजी मारली आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे होम ग्रांऊडवर खेळताना राजस्थानचा संघ मुंबई इंडियन्सला कडवी झुंज देताना दिसून येऊ शकतो. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

RR vs MI Pitch Report: मुंबई की राजस्थान कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
KKR vs RCB Last Over: 20 व्या षटकातील थरार! IPL च्या सर्वात महागड्या खेळाडूला फिरकी गोलंदाजाने ठोकले ३ षटकार -Video

पिच रिपोर्ट.. (MI VS RR Pitch Report)

ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये १९६ धावा ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. या मैदानावर दोन्ही डावात मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. या मैदानावर दवाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असलेला संघ अडचणीत येत नाही.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११...

मुंबई इंडियन्स:

इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या(कर्णधार), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल,जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी (इम्पॅक्ट प्लेअर - आकाश मधवाल)

राजस्थान रॉयल्स :

जोस बटलर,यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक),शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोमेन पॉवेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युजवेंद्र चहल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com