Kohli-Gambhir Altercation: विराट-गौतमला मैदानातील वादाचा फटका, BCCIची मोठी कारवाई

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनऊ सुपर जायंट्स 18 धावांनी पराभव केला.
Virat Kohli vs Gautam Gambhir Fight
Virat Kohli vs Gautam Gambhir FightSaam TV
Published On: 

IPL 2023 Fight Video Viral : इंडियन प्रीमियर लीगचा 43 वा सामना काल लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्या खेळला गेला. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली आणि लखनऊचा मेंटर गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादामुळे हा सामन्यात आयपीएलच्या इतिहासात लक्षात ठेवला जाईल. दोघांमधील वाद बराव वेळ सुरु होता. अखेर इतर खेळाडूंच्या मध्यस्थीने दोघांची समजूत काढण्यात आली आहे.

वादाची किनार लागलेल्या कालच्या सामन्यानंतर आता बीसीसीआयनं विराट कोहली, गौतम गंभीर आणि लखनऊचा खेळाडू नवीन उल हकवर कारवाई केली आहे.

विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांना 100 टक्के मॅच फी भरण्याचा दंड बीसीसीआयने ठोठावला आहे. तर नवीन उल हकवर 50 टक्के मॅच फी दंड ठोठवला आहे.

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight
Virat Kohli vs Gautam Gambhir : मैदानातच जोरदार राडा, विराट कोहली-नवीन भिडले; नतंर गंभीर सोबत झाला राडा - VIDEO

नेमका काय वाद झाला?

विराट कोहली कालच्या सामन्यात काहीसा अॅग्रेसिव्ह दिसत होता. सामना सुरु असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाल्याच दिसलं. तर सामना संपल्यानंतर विराट आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Latest sports updates)

तिघांमध्ये झालेल्या वादाचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या वादानंतर मैदानातील वातावरण चांगलंच तापलं होतं. सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर विराट, गंभीर आणि नवीन उल हक यांच्या वादाचे व्हिडीयो जोरदार व्हायरल होत आहेत.

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight
Rohit Sharma Wicket Video: रोहित शर्मा आऊट की नॉट आऊट? नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा, संपूर्ण वादानंतर आयपीएलचं सूचक ट्वीट

आरसीबीचा दणदणीत विजय

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनऊ सुपर जायंट्स 18 धावांनी पराभव केला. बँगलोरने लखनौसमोर अवघ्या 127 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बँगलोरच्या गोलंदजांनी अप्रतिम गोलंदाजी करत लखनऊ संघाला 108 धावांवर रोखलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com