Rohit Sharma Wicket Video: रोहित शर्मा आऊट की नॉट आऊट? नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा, संपूर्ण वादानंतर आयपीएलचं सूचक ट्वीट

Rohit Sharma Wicket Video: रोहित शर्माच्या विकेटवरील वादावरून आयपीएलनं सूचक ट्वीट केलं आहे.
rohit sharma wicket
rohit sharma wicketsaam tv
Published On: 

rohit Shamrma: आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा रोमहर्षक सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरला. त्यात विशेष म्हणजे आयपीएल स्पर्धेतील या १००० व्या सामन्यात रोहित शर्मा बाद झाला होता की नव्हता? यावरून नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली होती. याच विकेटवरील वादावरून आयपीएलनं सूचक ट्वीट केलं आहे. (Latest Marathi News)

आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात झालेल्या सामन्यात अंतिम षटकात टीम डेव्हिडने सलग ३ षटकार मारून मुंबई इंडियन्स संघाला जोरदार विजय मिळवून दिला आणि कर्णधाराला स्पेशल गिफ्ट दिलं. कारण त्यादिवशी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा ३६ वा वाढदिवस होता. याच सामन्यात रोहित शर्माचा विकेट चर्चेचा विषय ठरला.

rohit sharma wicket
Virat Kohli vs Gautam Gambhir : मैदानातच जोरदार राडा, विराट कोहली-नवीन भिडले; नतंर गंभीर सोबत झाला राडा - VIDEO

या डावात फलंदाजीला आलेला रोहित शर्मा संदीप शर्माच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला होता. मात्र रोहितची विकेट पडताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर अनेकांचं म्हणणं होतं की, रोहित शर्मा आऊट नव्हता'.

आयपीएलचं ट्विट

रोहितच्या विकेटचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते. मात्र, रोहित शर्माच्या विकेटवरून थेट आयपीएलनं व्हिडिओ ट्विट करत नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा हा सपशेल क्लिन बोल्ड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये सुरू असलेली चर्चा निष्फळ असल्याचेही समोर आले आहे.

अनलकी रोहित शर्मा

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २१३ धावांचा डोंगर सर करायचा होता. बड्डे बॉय रोहित शर्माकडून मोठया खेळीची अपेक्षा होती. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. त्याने या डावात ५ चेंडूंचा सामना करत ३ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com