Kieron Pollard
Kieron Pollardsaam Tv

IPL News: मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डची 12 वर्षांची साथ सोडली? कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?

मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेनडॉर्फचा त्यांच्या संघात समावेश केला आहे.
Published on

IPL NEWS : IPLची मिनी ऑक्शन कोची येथे 23 डिसेंबर रोजी होणे अपेक्षित आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व 10 संघांना या मिनी ऑक्शनपूर्वी त्यांची रिटेन्शन लिस्ट देण्यास सांगितले आहे. त्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे उद्यापर्यंत कोणत्या संघाने कुणाला रिलीज आणि रिटेन केलं हे स्पष्ट होईल. मात्र मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या स्टार खेळाडू कायरन पोलार्डला रिलीज केल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल लिलाव 2023 मधून मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेनडॉर्फचा त्यांच्या संघात समावेश केला आहे. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून जेसन बेहरेनडॉर्फला घेतलं आहे. मात्र जेसन बेहरेनडॉर्फ हा यापूर्वी मुंबई इंडियन्सचा भाग होता.

Kieron Pollard
T-20 Word Cup: टीम इंडियाच्या जखमेवर पाकच्या पंतप्रधानांनी मीठ चोळलं; इरफान पठाणने भरली सणसणीत मिर्ची

मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डला रिलीज केलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डला सोडले आहे. मुंबई इंडियन्स 2010 पासून मुंबई इंडियन्सचा भाग होता. वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूची मुंबई इंडियन्सच्या यशात महत्त्वाची भूमिका मानली जाते. मात्र आता मुंबई इंडियन्सने या खेळाडूला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कायरन पोलार्डच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने मुंबई इंडियन्सकडून 189 सामने खेळले. मुंबई इंडियन्ससाठी कायरन पोलार्डने 28.67 च्या सरासरीने 3412 धावा केल्या. यादरम्यान कायरन पोलार्डचा स्ट्राइक रेट 147.32 होता तर सर्वोत्तम धावसंख्या 87 आहे.

Kieron Pollard
T20 World Cup Final: पाकिस्तानच्या पराभवाची कारणं काय? नेमकी कुठे चूक झाली? वाचा सविस्तर

मुंबई इंडियन्सने या खेळाडूंना कायम ठेवले

रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टिम डेव्हिड्स, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स, तिलक वर्मा या खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर फॅबियन अॅलन, कायरन पोलार्ड, टायमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि हृतिक शोकीन यांना देखील मुंबई इंडियन्सने रिलीज केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com