T20 World Cup Final: पाकिस्तानच्या पराभवाची कारणं काय? नेमकी कुठे चूक झाली? वाचा सविस्तर

इंग्लंड संघाने 19 षटकांत 5 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलं आणि दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला.
Pakvs Eng
Pakvs EngSaam TV
Published On

T20 World Cup Final: इंग्लंड संघाने पाकिस्तानचा पराभव करत टी 20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मात्र इंग्लंडच्या विजयाने कोट्यवधी पाकिस्तानी नागरिकांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानची फलंजात सपशेल फेल ठरली. त्यामुळे पाकिस्तानला केवळ 137 धावाच करता आल्या. इंग्लंड संघाने 19 षटकांत 5 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलं आणि दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. या मोठ्या सामन्यात पाकिस्तानचा संघ अपयशी ठरला. या पराभवाची कारणं काय यावर एक नजर टाकूया.

पाकिस्तानची सुमार फलंदाजी

पाकिस्तानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची खराब ओपनिंग जोडी. सेमीफायनल मॅच सोडल्यास पाकिस्तानची ओपनिंग जोडी 6 मॅचमध्ये फ्लॉप ठरली होती. अंतिम फेरीतही तेच पाहायला मिळाले. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना 26 चेंडूत केवळ 29 धावा करता आल्या. रिझवान अवघ्या 15 धावा करून बाद झाला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने 48 डॉट बॉल खेळले. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद हारिस यांनी खूप आदिडॉट बॉल खेळले. त्यामुळे धावसंख्याही केवळ 138 धावांपर्यंत मर्यादित राहिली. (Sports News)

Pakvs Eng
T20 World Cup: वर्ल्ड कप विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार; टीम इंडियाही होणार मालामाल

आदिलची फिरकी

फायनलपूर्वी इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदकडे कोणीही इतके लक्ष दिले नव्हते. पाकिस्तान संघही याला हलक्यात घेत होता आणि त्याने अशा दोन विकेट घेतल्या ज्यामुळे खेळ इंग्लंडकडे वळला. त्याने कर्णधार बाबर आझमला 32 धावांवर बाद केले आणि युवा खळबळजनक मोहम्मद हरीसची विकेटही संघात घेतली

सॅम करनचा जादुई स्पेल

सॅम करनने इंग्लंडकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. रिझवान, मसूद, आणि नवाज यांना बाद केलं. त्याच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचे फंलदाज दबावाखाली खेळले. ज्याचा फायदा इंग्लंडच्या इतर गोलंदाजांनीही मिळाला. सॅम करनने आपल्या ४ ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ १२ धावा दिल्या.

Pakvs Eng
England Win T20 WC: इंग्लंडचा जेतेपदावर कब्जा, पाकिस्तानला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपवर कोरलं नाव

शाहीन आफ्रिदीची दुखापत

शाहीन आफ्रिदीची दुखापत हेही पाकिस्तानच्या पराभवाचे कारण आहे. फायनलमध्ये हॅरी ब्रूकचा कॅच घेताना शाहीन शाह आफ्रिदी जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो सामन्यात केवळ २.१ षटकेच फेकू शकला. याचा फायदा इंग्लंडला मिळाला आणि त्यांनी इफ्तिखारच्या पाच चेंडूंत १३ धावा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com