England Win T20 WC: टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. बेन स्टोक्सच्या झंझावाती कामगिरीच्या जोरावर मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १३८ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर इंग्लंडने ५ विकेट्स गमावत सामना जिंकला. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कब्जा केला. सॅम कुरन आणि आदिल रशीद यां४४वार्नीव संघासाठी निर्णायक गोलंदाजी केली. (Sports News)
बेन स्टोक्सची निर्णायक खेळी
पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने १९ षटकांत हे लक्ष्य गाठले. मात्र दहाव्या ओव्हरनंतर इंग्लंड संघाचा डाव कोलमडला होता. पाकिस्तान वरचढ वाटत होता. यावेळी बेन स्टोक्सने संघासाठी संयमी खेळी केली. त्याने 49 चेंडूंचा सामना करत नाबाद 52 धावा केल्या. स्टोक्सच्या या खेळीत ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मोईन अलीने ४९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने 13 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार मारले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी फ्लॉप ठरली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाढू शकला नाही. शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने ३२ धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून सॅम कुरनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने १९ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. बेन स्टोक्स ४९ चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे पहिले अर्धशतक होते.
इंग्लंडने ३० वर्षापूर्वीचा बदला घेतला
इंग्लंडने १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव केला. आता ३० वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नमध्येच पाकिस्तानचा पराभव करून बदला घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.