ICC T-20 Word Cup Latest News: आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागला होता. भारतीयांना या पराभवामुळे निराशा झाली होती. यावर देशभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींनी टीम इंडियाला आलेल्या अपयशाबद्दल सांत्वन केलं आहे. मात्र, शेजारचा देश पाकिस्तान खेळाचंही राजकारण करत जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्विट करत टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं. यामुळे खवळलेल्या इरफान पठाण याने पाकच्या पंतप्रधानांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. (Irfan Pathan Latest News)
T-20 World Cup विश्वचषकाच्या IND vs ENG उपांत्य फेरीत झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडिया (Team India) मायदेशी पोहोचली असली तरी पराभवाची चर्चा सुरूच आहे. यादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी टीम इंडियाच्या या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. ज्याला भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने जोरदार उत्तर दिलं आहे.
भारत-इंग्लंड उपांत्य फेरीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट केले की, रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. पण इथे शाहबाज शरीफ यांनी उपरोधिकपणे लिहिले की रविवारी १५२/० विरुद्ध १७०/० असा सामना होणार आहे. वास्तविक, गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता आणि यावर्षी इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. (Latest Marathi News)
इरफानने लिहिले - तुमच्या आणि आमच्यात हाच फरक आहे. शाहबाज शरीफ यांच्या या ट्विटला दोन दिवसांनी उत्तर देताना इरफान पठाणने लिहिले की, "तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी असतो आणि तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखात सुखी असतात. त्यामुळेच आपला देश सुधारण्याकडे तुमचं लक्ष नाही." इरफानच्या या सणसणीत ट्विटनंतर पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत.
दरम्यान, T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. पाकिस्तानने 2009 मध्ये आणि इंग्लंडने 2010 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. दोन्ही संघ दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकणार आहेत. दोघांनीही एकदा अंतिम सामना गमावला आहे. इंग्लंडचे फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. बटलर आणि अॅलेक्स हेल्स सातत्याने धावा करत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी पाकिस्तानकडे आहे. त्यांच्याकडे चार गोलंदाज आहेत ज्यांनी सातत्याने 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.