आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

High-Voltage Drama at Asia Cup Award Ceremony: आशिया कप भारतीय महिला क्रिकेट संघानं जिंकला खरा...मात्र त्यानंतर दुबईच्या मैदानावर हाय होल्टेज ड्रामा झाला. भारतानं आशिय चषकची ट्रॉफी घेण्यास का इन्कार केला? नेमकं यामागे काय कारण आहे?
INDIA WOMEN REFUSE ASIA CUP TROPHY FROM MOHSIN NAQVI
INDIA WOMEN REFUSE ASIA CUP TROPHY FROM MOHSIN NAQVIsaam tv
Published On

भारतीय महिला क्रिकेट संघानं आशिया चषकात श्रीलंकेवर 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र या विजयापेक्षा सर्वाधिक चर्चा रंगलीय ती दुबईच्या ग्राऊंडवर मॅचनंतर आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यातल्या हायहोल्टेज ड्रामाची. आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघानं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिलाय. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरील भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. गेल्या वर्षीही भारत-पाकिस्तानमध्ये याच आशिया कपवरून मोठा वाद निर्माण झाला होता, त्यावर एक नजर टाकूयात...

आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा पाकची नाचक्की

एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे तीव्र परिणाम भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संबंधांवरही झाले. पाकिस्तानविरुद्ध खेळायचंं, मात्र हस्तांदोलन टाळायचं, अशी भूमिका भारतानं घेतली. 2025 मध्ये दुबईत भारत आणि पाकिस्तानात आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. विजेतेपद मिळवल्यानंतर भारतानं आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही अध्यक्ष मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

महिला विश्वचषकात भारताच्या नो हँडशेक पॉलिसीमुळे आधीच चर्चा सुरू असताना आता थेट ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे आणखीनंच मोठा भडका उडालाय. विशेष म्हणजे, 2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकांना ब्रेक लागलाय. विशेष म्हणजे, या स्पर्धेत BCCIचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, फायनलपूर्वी यासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. एकीकडे, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पाकिस्तानचे मोहसीन नक्वी ट्रॉफी प्रदान करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. तर दुसरीकडे, BCCIनंही नक्वींकडून ट्रॉफी न स्वीकारण्याची भूमिका कायम ठेवली. यामुळे दुबईच्या जाहीर कार्यक्रमात टीम इंडियाच्या महिला चॅम्पियन्सनं दहशतावाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची लक्तरं पुन्हा जगभर वेशीला टांगली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com