Ind vs SL ODI Series: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीजमधून जसप्रीत बुमराह OUT; सहाच दिवसात BCCI ने बदलला निर्णय

तीन जानेवारीलाच बुमराहची भारतीय संघात एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र आता त्याला या मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.
Jasprit Bumrah News
Jasprit Bumrah NewsSaam TV
Published On: 

India Vs Srilanka ODI Siries: भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधीच निवड समितीने मोठा धक्का दिला असून जसप्रीत बुमराहला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. तीन जानेवारीलाच बुमराहची भारतीय संघात एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र आता त्याला या मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहबाबत बीसीसीआय (BCCI) कोणतीही घाई करणार नसल्याने त्याला दुखापतीतून ठीक होण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.

Jasprit Bumrah News
Ind Vs SL ODI Series: गुवाहाटी पुन्हा चर्चेत! रोहित शर्मा हॉटेलमध्ये पोहोचला अन् मिळालं असं गिफ्ट; हिटमॅन झाला जाम खुश

जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो विश्वचषकही खेळू शकला नाही. यानंतर, त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचारही घेतले होते.ज्यानंतर तो फिट असल्याचेही घोषित करण्यात आले.

तो फिट असल्याचे घोषित केल्यानंतरच टीम इंडियाच्या निवड समितीने त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) एकदिवसीय संघात समावेश केला होता, परंतु. त्याला अधिक विश्रांती देण्याची गरज आहे. यासाठी त्याला पुन्हा मालिकेतून वगळण्यात आले आहे.

Jasprit Bumrah News
विदर्भात थंडीची लाट; नागपूरचं तापमान ९ अंशांवर तर अनेक जिल्ह्यात तापमान १० अंशांच्या खाली

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत खेळताना दिसू शकतो. ही मालिका 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com