विदर्भात थंडीची लाट; नागपूरचं तापमान ९ अंशांवर तर अनेक जिल्ह्यात तापमान १० अंशांच्या खाली

उत्तर भारतात सध्या मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आलीय. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातंही थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
Maharashtra Winter Update
Maharashtra Winter UpdateSaam Tv
Published On: 

नागपूर : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातही दिसत आहे. राज्यातील तापमानाचा पारा गेल्या काही दिवसात घसललेला दिसून येत आहे. विदर्भातील तापमानाचा (Temperature)  पारा घसरताना दिसत आहे.

हवामान खात्याने देखील विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. नागपूरात गेल्या २४ तासांत या मोसमातील सर्वात कमी ८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे नागरपूरकर कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत.

Maharashtra Winter Update
Cold Wave: थंडीचा जोर वाढला; धुळ्यात तापमान ५ अंशावर

विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आहे. त्यामुळे थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या थंडीची लाट कायम असून, गोंदिया, नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात तापमान घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra News)

Maharashtra Winter Update
Pune : शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा; पुण्यातील CBSEच्या आणखी 10 शाळा रडारवर

उत्तर भारतात सध्या मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आलीय. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातंही थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी थंडीची लाट ते तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com