Ind Vs SL ODI Series: गुवाहाटी पुन्हा चर्चेत! रोहित शर्मा हॉटेलमध्ये पोहोचला अन् मिळालं असं गिफ्ट; हिटमॅन झाला जाम खुश

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होण्याआधी कर्णधार रोहित शर्माला हॉटेलमध्ये पोहोचताच खास गिफ्ट मिळाले आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSaam Tv
Published On: 

Ind Vs Srilanka ODI Siries: टी ट्वेंटी मालिकेत श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना राजकोटमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माही गुवाहाटीमध्ये दाखल झाला आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होण्याआधी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हॉटेलमध्ये पोहोचताच खास गिफ्ट मिळाले आहे.

Rohit Sharma
Crime News: पत्‍नीच्‍या चारित्र्यावर बोलल्‍याने झाला वाद; गोळ्या झाडून केली हत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ गुवाहाटीमध्ये दाखल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माच्या एका चाहत्याने त्याला मोठे गिफ्ट दिले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहितच्या या चाहत्याने त्याला हाताने तयार केलेले सुंदर स्केच गिफ्ट केले आहे. यामध्ये रोहित शर्माचा फोटो पाहायला मिळत आहे.

महत्वाचे म्हणजे गुवाहाटीमध्ये आत्तापर्यंत रोहित शर्माने एकच सामना खेळला आहे. या एका सामन्यात त्याने झंझावती शतक ठोकले आहे. २०१८ मध्ये रोहितने वेस्टइंडिजविरुद्ध हा सामना खेळला होता. या सामन्यात रोहितने ११७ चेंडूत १५२ धावा कुटल्या होत्या.

Rohit Sharma
Cold Wave: थंडीचा जोर वाढला; धुळ्यात तापमान ५ अंशावर

श्रीलंकेविरुद्ध रोहितचे रेकॉर्ड: रोहित शर्माचे श्रीलंकेविरुद्धची (Srilanka) कामगिरी जबरदस्त आहे. ज्यामध्ये त्याने लंकेविरुद्ध खेळलेल्या ४५ डावांत १६६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याची २६४ धावांची क्रिकेटमधील विक्रमी खेळीही त्याने श्रीलंकेविरुद्धच खेळली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १० जानेवारीला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com