IND vs SA 1st ODI : पराभवाचा वाचपा काढणार! IND vs SA पहिला वनडे कुठे पाहाल? प्लेईंग ११ कशी असेल, वाचा A टू Z माहिती

IND vs SA 1st ODI Live Streaming : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना रांचीमध्ये होणार आहे. कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
IND vs Sa
IND vs Sagoogle
Published On

IND vs SA 1st ODI Live Streaming Details : कसोटी मालिकेत झालेल्या माणहाणीकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्याच्या वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. रांचीमधील जेएससीए स्टेडियममध्ये पहिला सामना होणार आहे. शुभमन गिल याच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाची धुरा संभाळत आहे.रोहित शर्मा, विराट कोहली टीम इंडियाकडून खेळताना दिसतील. दुसरीकडे टेम्बा बवुमा दक्षिण आफ्रिकेची धुरा संभाळणार आहे. (IND vs SA 1st ODI live streaming in India)

दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या वनडे सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना आराम देण्यात आला आहे. दुखापतग्रस्त असल्यामुळे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या मालिकेतून बाहेर आहेत. या वनडे मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. दोन कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरले.

IND vs Sa
National Herald Case : राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल, गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामना किती वाजता सुरू होणार ? (IND vs SA 1st ODI Match Timing, Live Streaming)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामना आज दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. दुपारी एक वाजता नाणेफेक होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहता येणार आहे. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टार या अॅपवर पाहता येणार आहे.

IND vs Sa
Prakash Bharsakale : ते माझ्या मरणाची वाट पाहत होते, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

रांचीमध्ये आज कसं असेल हवामान? (IND vs SA 1st ODI Ranchi Weather Updates)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना रांचीमध्ये होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता नाही. रविवारी रांचीमधील कमाल तापमान २४ डिग्री सेल्सिअस सेल तर किमान तापमान १२ डिग्री इतके राहू शकते. सामन्यावेळी पावसाची शक्यता नाहीच.

IND vs Sa
Navneet Rana : पुरुष मतदार २ वाजेपर्यंत पार्ट्या करतील, महिला मतदार इमानदार; नवनीत राणांचं पुरुषाबद्दल वादग्रस्त विधान

पिच रिपोर्ट (IND vs SA 1st ODI Pitch Report)

रांचीमधील जेएससीए (JSCA) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना होणार आहे. जेएससीए मैदानाची खेळपट्टी फिरकी गोंलदाजांना मदत देणारी आहे. सुरूवातीला वेगवान गोंलदाजाला मदत मिळू शकतो. या मैदानावर मोठी धावसंख्या होण्याची शक्यता कमीच आहे. भारतीय संघाने जेएससीए या मैदानावर ३ सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

IND vs Sa
Delhi fire : राजधानीत अग्नितांडव, ४ मजली इमारतीचा कोळसा, ४ जणांचा होरपळून मृत्यू

दक्षिण अफ्रीकेची संभाव्य प्लेईंग ११ (South Africa Likely Playing XI)- टोनी डी जोर्जी, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), एडेन मार्करम, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यानसेन, केशव महाराज, प्रेनेलन सुब्रायन, लंबी नगिदी आणि नांद्रे बर्गर.

भारताची संभाव्य प्लेईंग ११ (India Likely Playing XI)- रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड़/यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह.

IND vs Sa
Local Body Election : मनपा, झेडपी निवडणुका होणारच, स्थगिती नाहीच; कोर्टात काय झालं ते शब्द ना शब्द वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com