Ind vs Pak : 3842 दिवसांची अजिंक्य घोडदौड! भारतानं हॉकीचं मैदान मारलं, पाकिस्तानला लोळवलं; वर्ल्डकपच्या टॉप ८ मध्ये दणक्यात एन्ट्री

india vs pakistan hockey world cup india win : भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानला लोळवून आपली अजिंक्य मालिका सुरुच ठेवली आहे. भारताच्या धुरंधरांनी पाकिस्तानचा ५-३ अशा फरकानं पराभव करून वर्ल्डकपच्या टॉप ८ मध्ये स्थान निश्चित केलं.
हॉकीच्या मैदानातही पाकिस्तानला भारतानं लोळवलं, हॉकी वर्ल्डकपच्या टॉप ८ मध्ये एन्ट्री
Hockey India win Against Pakistansaam tv
Published On

क्रिकेटचं मैदान असो की हॉकीचं..भारताचा संघ आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानला लोळवणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष...हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतानं पुन्हा पाकिस्तानला पराभूत करून आपली ३८४२ दिवसांची अखंडीत विजयी मालिका पुढे सुरूच ठेवलीय. वर्ल्डकपच्या पूल डीमधील करो वा मरो सामन्यात भारतानं पाकिस्तानला ५-३ ने धुव्वा उडवला. या एकतर्फी विजयासोबत भारतानं वर्ल्डकप स्पर्धेत टॉप ८ मधील स्थान निश्चित केलं.

भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानवरील दबदब्याची मालिका कायम ठेवली. पाकिस्तानला ५-३ अशी धूळ चारून विजयी पताका फडकावली. इंग्लंडविरुद्धच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत पूल डीमध्ये भारतीय संघानं जोरदार कमबॅक करत पाकिस्तानला लोळवलं. सुरुवातीपासूनच भारतीय संघानं सामन्यावर मजबूत पकड ठेवली.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवातून भारतीय हॉकी संघ सावरला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार कमबॅक केलं आणि करो वा मरो सामन्यात विजय मिळवून अव्वल ८ संघांत आपलं स्थान पक्कं केलं. कर्णधार हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटीवर खरा उतरला. स्वतः हरमनप्रीतनं दोन आणि अभिषेकने दोन गोल डागले. तर हार्दिक सिंग यानं एक गोल डागला.

पहिल्या क्वार्टरपासूनच भारतीय संघानं आक्रमक खेळ केला. पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला. चौथ्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरची मिळालेली संधी साधली आणि कर्णधार हरमनप्रीतनं गोल डागला. भारताला १-० ची आघाडी मिळाली. १० व्या मिनिटाला अभिषेकनं फील्ड गोल डागून २-० ची आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही २० व्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरची मिळालेली संधी हरमनप्रीतनं दवडली नाही. त्यानं वैयक्तिक दुसरा गोल डागून ३-० ची आघाडी मिळवली.

हा एकतर्फी सामना होईल असा अंदाज असतानाच, अचानक पाकिस्तानच्या खेळाडूंनी कमबॅक केलं. पाकिस्तानकडून शाहिद हन्नान यानं २१ व्या मिनिटाला गोल डागला. २३ व्या मिनिटाला भारतीय संघाच्या अभिषेकनं चौथा गोल डागला. खेळाच्या २४ व्या मिनिटालाच पाकिस्तानकडून सुफयान खान यानं गोल डागला आणि पुन्हा ४-२ अशी स्थिती झाली.

हॉकीच्या मैदानातही पाकिस्तानला भारतानं लोळवलं, हॉकी वर्ल्डकपच्या टॉप ८ मध्ये एन्ट्री
ICC Test Ranking : कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ; नंबर १ फलंदाज थेट चौथ्या स्थानी, टॉप १० मध्ये किती भारतीय फलंदाज?

भारताचा अखेरपर्यंत दबदबा

हाफ टाइमनंतर खेळ पुन्हा सुरू झाला. तिसऱ्या क्वार्टरमध्येच भारतीय संघाकडून हार्दिकनं पाचवा गोल डागला. भारतीय संघानं ५-२ ची निर्णायक आघाडी मिळवली. या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी अनेक प्रयत्न केले. पण भारतीय बचावफळी भेदण्यात पाकिस्तानच्या खेळाडूंना यश आलं नाही. अखेर भारतानं विजयी पताका फडकावून पाकिस्तानविरुद्धची अजिंक्य मालिका कायम ठेवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com