

आशिया चषकात शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा हाय व्होल्टेज सामना श्रीलंकेच्या कँडीमध्ये रंगणार आहे. या सामन्याच्या पूर्व संध्येला पाकिस्तान संघाने भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे.
शाहीन आफ्रिदीबाबत मोठी अपडेट समोर..
या सामन्यापूर्वी असं म्हटलं जात होतं की, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. मात्र पाकिस्तान संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शाहीन आफ्रिदी पूर्णपणे फिट असून त्याचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
या सामन्यासाठी पाकिस्तान संघाने प्लेइंग ११ मध्ये कुठलाच बदल केला नाही. जो संघ नेपाळविरुद्ध खेळण्यासाठी उतरला होता. तोच संघ भारतीय संघाविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे.
भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी आहे पाकिस्तानची प्लेइंग ११ - फखर जमान, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (यष्टिरक्षक), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी. (Latest sports updates)
पावसामुळे सामना होणार रद्द?
हा सामना पावसामुळे धुतला जाणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. वेदर डॉट कॉमच्या अहवालानूसार भारत- पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याती शक्यता ही ८० टक्के इतकी असणार आहे.
तर दिवसाचे तापमान २६ डिग्रीच्या आसपास असेल.तसेच १० ते १५ किमी प्रतीतास वेगाने वारे वाहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, इशान किशन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.