नवी दिल्ली : बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये ३ सामन्यांची मालिकेचा पहिला कसोटी सामना सुरु आहे. न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात ४६ धावांवर गुंडाळलं. त्यानंतर फलंदाजीसाठी उतररेल्या न्यूझीलंडने ४०२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडच्या फलंदाजीनंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दिवसअखेर भारताने ३ गडी गमावून २३१ धावा कुटल्या. यामुळे न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी राहिली आहे.
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात सरफराज खान आणि विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने २३१ धावा कुटल्या. भारताने २३१ धावा करत चांगलं कमबॅक केलं. भारताच्या धावसंख्येमुळे न्यूझीलंडकडे फक्त १२५ धावांची आघाडी राहिली आहे. दिवसअखेर भारताच्या सरफराजच्या ७० धावा झाल्या होत्या. तर या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टेस्ट फॉरमॅटमध्ये ९००० धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात विराटने ७० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या व्यतिरिक्त विराटने सरफराज खानबरोबर १०० धावांची भागीदारी रचली.
विराट कोहली आणि सरफराज खान यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताच्या २०० धावा पूर्ण झाल्या. भारताने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ३ गडी गमावले आहेत. विराटने ७० चेंडूत अर्धशतक पू्र्ण केलं. तर सरफराज खानने ४२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. सरफराज खानने कसोटी सामन्यात चौथं अर्धशतक पूर्ण केलं आहे. आजच्या डावात रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, त्यानंतर रोहित शर्माने बाद झाला. रोहितने ६३ चेंडूत ५२ धावा केल्या. तर यशस्वी जयस्वाल देखील ३५ धावा करून बाद झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.