IND vs BAN 2nd Test, Virat Kohli Record: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. विराट कोहलीनेही बांगलादेशी गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. यादरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा रेकॉर्ड करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीला मालिकेतील पहिल्या कसोटीत मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली तेव्हा त्याने परिस्थितीनुसार आक्रमक फलंदाजी केली. दोन्ही बाजूंनी आक्रमक फलंदाजी सुरु होती. विराटनेही गंगेत हात धुतले.
यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७००० धावांचा डोंगर सर केला. विराटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला गाठला आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने १३९०६ धावा केल्या आहेत. तर टी -२० क्रिकेटमध्ये त्याने ४१८८ धावा केल्या आहेत. विराटने ५९४ डावात हा डोंगर सर केला आहे. यासह तो सर्वात जलद २७००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा तर दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४,३५७ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या कुमार संगकाराच्या नावे २८०१६ धावा करण्याची नोंद आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रिकी पाँटिंगच्या नावे २७,४८३ धावा करण्याची नोंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.