PAK vs ENG 2nd Test : पाकिस्तानने पराभवाचा वचपा काढलाच! इंग्लंडला मात देत ३ वर्षांनी घरच्या मैदानावर जिंकला टेस्ट सामना

PAK vs ENG 2nd Test : पाकिस्तानच्या टीमने घरच्या मैदानावर तब्बल १३३८ दिवसांनी टेस्ट सामना जिंकला आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा तब्बल १५२ रन्सने पराभव केला आहे.
PAK vs ENG 2nd Test
PAK vs ENG 2nd Testsaam tv
Published On

पाकिस्तानच्या टीमने इंग्लंडला एक मोठा धक्का दिलाय. दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव करत पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आहे. यावेळी पाकिस्तानच्या टीमने घरच्या मैदानावर तब्बल १३३८ दिवसांनी टेस्ट सामना जिंकला आहे. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा तब्बल १५२ रन्सने पराभव केला आहे.

पहिल्या टेस्ट सामन्यात झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानने मुलतानचं मैदान गाजवलं. या सामन्यात दोन्ही डावांमध्ये इंग्लंडच्या टीमला काही साजेसा खेळ करता आला नाही. इंग्लंडची टीम दुसऱ्या डावातही गडगडली. यावेळी तळाच्या दोन फलंदाजांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानच्या नोमान अलीने ८ विकेट्स घेत इंग्लंडचा पराभव केला.

PAK vs ENG 2nd Test
Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

टेस्ट सिरीजमध्ये बरोबरी

पाकिस्तान क्रिकेट टीमने दुसऱ्या टेस्ट सामन्यात इंग्लंडचा 152 रन्सने पराभव केला आहे. यासह 3 सामन्यांची टेस्ट सिरीजमध्ये आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि 47 रन्सने विजय मिळवला होता. पाकिस्तानने 2021 नंतर घरच्या मैदानावर टेस्ट सामना जिंकला होता. त्यावेळी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा पराभव केला होता.

दुसऱ्या टेस्ट सामन्यात इंग्लंडच्या टीमला 297 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. यावेळी प्रत्युत्तरात इंग्लंडची संपूर्ण टीम दुसऱ्या डावात अवघ्या 144 रन्सवर गारद झाली. पाकिस्तानकडून नोमान अलीने दुसऱ्या डावात आठ, तर साजिद खानने दोन विकेट्स घेतल्या.

PAK vs ENG 2nd Test
Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ३६ चेंडूत 37 रन्स करून बाद झाला. या विकेटनंतर इंग्लंड टीमच्या जिंकण्याच्या आशाही मावळल्या. यानंतर आता तिसरी आणि शेवटची टेस्ट २४ ऑक्टोबर रोजी रावळपिंडीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com