IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

IND vs NZ 1st Test : भारताविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पकड मिळवली आहे. न्यूझीलंडने तब्बल ३५६ धावांची आघाडी घेतली.
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 1st TestBCCI
Published On

IND vs NZ 1st Test : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाची पहिल्या कसोटीतील अवस्था गंभीर झाली आहे. न्यूझीलंडच्या विराट कामगिरीमुळे भारतीय संघ पिछाडीवर पडलाय. आधी फलंदाजांनी नांगी टाकली, त्यानंतर गोलंदाजांनाही आपला करिश्मा दाखवला आला नाही. न्यूझीलंडने पहिल्या डावात तब्बल ३५६ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघला बंगळुरु कसोटी वाचवण्यासाठी भीमपराक्रम करावा लागणार आहे.

भारताला ४६ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची आघाडी आहे. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र याने शतकी खेळी केली. रचिन रवींद्र याने करिअरमधील दुसरे शतक ठोकले. भारताच्या फिरकी माऱ्यापुढे रचिन रवींद्र याने १३४ धावांची खेळी केली. त्याशिवाय टीम साऊदी आणि डेवॉन कॉनवे यांनाही अर्धशतके ठोकली. सांघिक खेळाच्या बळावर न्यूझीलंडने कसोटीवर पकड मिळवली आहे.

IND vs NZ 1st Test
IND vs NZ, 1st Test: रोहित शर्मा चुकला, तो निर्णय भारताच्या अंगलट आला! सामनाही हातातून निसटणार?

बंगळुरु कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली, रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा प्रथम फलंदाजीचा निर्णय अंगलट आला. एकापाठोपाठ एक दिग्गज तंबूत परतले. भारताचा डाव फक्त ४६ धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडने तीन विकेटच्या मोबदल्यात १८० धावा करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर मोहम्मद सिराजने लगेच डॅरेल मिचेल याचा पत्ता कट केला. त्यानंतर न्यूझीलंडला लागोपाठ धक्के बसले. एकवेळ न्यूझीलंड सात बात २३३ अशा स्थितीमध्ये होता. पण टीम साऊदीच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत होते. त्यानं खेळपट्टीवर पाय रोवले, दुसरीकडे रविन रवींद्र याने धावांचा पाऊस पाडला. रवींद्र याने १२४ चेंडूत शतक पूर्ण केले. साऊदीने त्याला सूंदर साथ दिली. साऊदी आणि रचिन रवींद्र यांनी १३७ धावांची भागिदारी केली. त्यामुळे किवीला मोठी धावसंख्या उभारता आली.

IND vs NZ 1st Test
IND vs NZ : काय हा प्रकार! रोहित २, विराट ०, राहुल ०, फक्त ४६ धावांत भारताचे शेर ढेर, टीम इंडियाचं नेमकं चुकलं काय?

भारताकडून रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले, त्यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने दोन जणांना तंबूचा रस्ता दाखवला. सिराज आणि अश्विन यांना एक एक विकेट मिळाली. दरम्यान, भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला आता सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल मैदानात आले आहेत. दोघांचा मोठी खेळी करण्याचे मनसुबे असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com