IND vs NZ Final: वर्ल्डकप फायनलचा थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार, पाहा 30 सामन्यांचा रेकॉर्ड सांगतो कोणाचं पारडं जड!

India vs New Zealand Head to Head T20I Matches: टी20 वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड काय सांगतो?
India vs New Zealand Head to Head T20I Matches
India vs New Zealand Head to Head T20I Matchessaam tv
Published On

टी-२० वर्ल्डकप २०२६ चा आज शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिययमध्ये या स्पर्धेची फायनल रंगणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड या दोन्ही टीम्स वर्ल्डकपच्या ट्रॉफीसाठी आमने-सामने येणार आहे.

एकीकडे टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर न्यूझीलंड त्यांचा पहिला टी-२० वर्ल्डकप उचलण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आजच्या या सामन्यात कोणत्या टीमचं पारडं जड आहे ते पाहूयात.

India vs New Zealand Head to Head T20I Matches
ICC Women's World Cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार पुरुषांपेक्षाही जास्त बक्षीस, किती मिळणार प्राइस मनी?

३० सामन्यांचा संपूर्ण आढावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण ३० टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये वर्ल्डकपच्या सामन्यांचा देखील समावेश आहे. जर आपण दोन्ही संघांमधील ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा निकाल पाहिला तर त्यामध्ये टीम इंडिया वरचढ दिसून येते. तर टी-२० वर्ल्डकपचे सामने पाहिले तर न्यूझीलंडचं पारडं यावेळी जड दिसतंय.

कोणाचं पारडं सर्वात भारी?

एकंदरीत पाहिल्यास ३० सामन्यांमध्ये भारताने एकूण १६ सामने जिंकलेत. तर न्यूझीलंडच्या टीमने ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ३ सामने टाय झालेत. आतापर्यंत दोन्ही टीम टी-२० वर्ल्डकपमध्ये ३ वेळा एकमेकांसमोर आल्या आहेत. मुख्य म्हणजे या तिन्ही वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

India vs New Zealand Head to Head T20I Matches
IND vs NZ: भारत विरूद्ध न्यूझीलंडचा सामना पावसामुळे रद्द झाला तर कोण ठरणार विजेता?

२००७, २०१६ आणि २०२१ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता. न्यूझीलंडने २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये १० रन्सने, २०१६ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ४७ रन्सने आणि २०२१ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ८ विकेट्स राखून भारताचा पराभव केला.

India vs New Zealand Head to Head T20I Matches
IND vs NZ Final: ग्रुप स्टेजचा हिरो, सेमीफायनलचा व्हिलन! फायनलमध्ये वरूण चक्रवर्तीला संधी मिळणार का? कर्णधार सूर्याने दिलं उत्तर

भारतीय मैदानावर कसा आहे न्यूझीलंडच्या टीमचा रेकॉर्ड

२०२६ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना भारताच्या मैदानावर रंगणार आहे. अशावेळी दोन्ही संघ भारतीय भूमीवर १६ टी-२० सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने ११ वेळा सामने जिंकलेत तर न्यूझीलंडने ५ वेळा विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com