ICC Women's World Cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार पुरुषांपेक्षाही जास्त बक्षीस, किती मिळणार प्राइस मनी?

ICC Women's World Cup Winner Prize Money: महिला वनडे वर्ल्डकपचा फायनल सामना २ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार आहे, जाणून घेऊयात.
ICC Women's World Cup Winner Prize Money
ICC Women's World Cup 2025google
Published On

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ चा फायनल सामना २ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने येतील. हा सामना डी. वाय पाटील स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. यावेळी वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला आयसीसी भरघोस बक्षीस रक्कम देणार आहे. या वर्षी दिली जाणारी प्राइस मनी ही २०२२ वर्ल्डकपच्या तुलनेत चार पट जास्त आहे. विजेत्या संघाला किती प्राइस मनी मिळणार, जाणून घेऊयात.

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपमध्ये कोट्यवधींची प्राइस मनी

आयसीसीने महिला वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला १३.८८ मिलियन यूएस डॉलर्स प्राइस मनी जाहीर केली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही प्राइस मनी १२३ कोटी रुपये इतकी आहे. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या २०२२ च्या महिला वर्ल्डकपमध्ये ३.५ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३१ कोटी रुपये इतकी प्राइस मनी देण्यात आली होती. यावर्षी देण्यात येणारी प्राइस मनी ही २०२२ पेक्षा चार पट जास्त आहे.

एवढेचं नाही तर, आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ ची प्राइस मनी पुरुषांच्या वनडे वर्ल्डकप २०२३ च्या प्राइस मनीपेक्षाही जास्त आहे. २०२३ चा पुरुष वनडे वर्ल्डकप भारतात खेळला गेला होता आणि ऑस्ट्रेलियाने या कपवर आपले नाव कोरले होते. त्यांना १० मिलियन अमेरिकन डॉलर्स मिळाले होते. भारतीय चलनानुसार, ८९ कोटी रुपये इतकी प्राइस मनी मिळाली होती.

ICC Women's World Cup Winner Prize Money
IND vs AUS: भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चारली धूळ

महिला वनडे वर्ल्ड कप विजेते संघ

भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघानी अद्याप वर्ल्डकप जिंकलेला नाही. यामुळे यावर्षी नवीन वर्ल्डकप विजेता संघ जगाला मिळेल. तसेच, दोन्ही संघापैकी जो संघ वर्ल्डकप जिंकेल तो पहिल्यांदाच विश्वविजेता होईल.

सर्वाधिक महिला वर्ल्डकप जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सात वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने १९७८, १९८२, १९८८, १९९७, २०१३ आणि २०२२ मध्ये महिला वर्ल्डकप जिंकला होता. या यादीत इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी चार वेळा हे विजेतेपद जिंकले आहे. त्यांनी १९७३, १९९३, २००९ आणि २०१७ मध्ये वर्ल्डकप जिंकला.तर न्यूझीलंडने २००० मध्ये फक्त एकदाच महिला वनडे वर्ल्डकप जिंकला आहे.

ICC Women's World Cup Winner Prize Money
Rohit Sharma: रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून KKR मध्ये जाणार का? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com