Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Asia Cup 2025 Super 4 Scenario: भारत पाकिस्तान (India Pakistan) दोन्ही संघांनी ग्रुप स्टेजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत आणि हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.
Asia Cup 2025 Super 4 Scenario
Asia Cup 2025 Super 4 Scenariosaam tv
Published On
Summary
  • पाकिस्तानने युएईवर 41 रन्सने विजय मिळवला.

  • पाकिस्तान सुपर-4 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आहे.

  • भारत आणि पाकिस्तानमध्ये 21 सप्टेंबरला सामना होणार आहे.

एशिया कप 2025 मध्ये बुधवारी पाकिस्तान आणि युएई यांच्यात झालेल्या दहाव्या सामन्यात पाकिस्तानने 41 रन्सने विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, यजमान युएईचा प्रवास संपुष्टात आला.

ग्रुप-ए मधून भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनी सुपर-4 साठी आपली जागा पक्की केलीये. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. दोन्ही टीम्समध्ये पुढील सामना 21 सप्टेंबर म्हणजेच रविवारी दुबईमध्ये होणार आहे.

Asia Cup 2025 Super 4 Scenario
IND vs PAK Asia Cup: विजयी षटकार मारला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला; पाकिस्तानच्या टीमचा तोंडावर अपमान

भारत-पाक पुन्हा आमनेसामने

या वेळी एशिया कपमध्ये एकूण 8 टीम्स सहभागी झाल्या होत्या. त्यांना दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं होतं. सुपर-4 साठी प्रत्येक गटातून दोन टीम्सची निवड होणार होती. ग्रुप-ए मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान या टीम्स होत्या.

ग्रुप एमध्ये भारताने आपले पहिले दोन सामने जिंकून आधीच सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला होता. ओमान आधीच स्पर्धेबाहेर झाला होता. त्यामुळे पाकिस्तान आणि युएई यांच्यात पुढे जाण्यासाठी झुंज होती. अखेर पाकिस्तानने विजय मिळवत सुपर-4 मध्ये आपली जागा पक्की केली आणि आता त्यांचा सामना भारताशी होणार आहे.

Asia Cup 2025 Super 4 Scenario
Mumbai Cricket Association: मुंबईत पोहोचली ICC वुमेंस वर्ल्डकप ट्रॉफी; माजी महिला कर्णधारांना MCA कडून खास सन्मान

भारताचा पाकिस्तानला धक्का

ग्रुप स्टेजमध्ये रविवारी भारत-पाक यांच्यात सामना खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्स राखून सहज विजय मिळवला होता. पण हा सामना वादग्रस्त ठरला होता. कारण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. पाकिस्तानने यावर आक्षेप नोंदवून आयसीसीकडे तक्रार केली होती. पीसीबीने सामन्याचे रेफरी अँडी पायक्रीफ्ट यांना स्पर्धेतून हटविण्याची मागणी केली होती.

आयसीसीने मात्र ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर पाकिस्तानी टीमने युएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी खेळण्यास नकार देण्याची धमकी दिली होती. अखेरीस सुमारे एक तास उशिराने ते मैदानावर उतरले आणि सामना झाला.

Asia Cup 2025 Super 4 Scenario
Betting App Case: युवराज सिंहला ED ची नोटीस; 23 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

भारत आणि पाकिस्तानचा प्रवास

या स्पर्धेत भारताने आपला प्रवास युएईविरुद्धच्या मोठ्या विजयाने सुरू केला. दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना भारत शुक्रवारी ओमानविरुद्ध खेळणार आहे.

Asia Cup 2025 Super 4 Scenario
Asia Cup 2025: पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर; यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार, नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानने आपला पहिला सामना ओमानविरुद्ध जिंकला. दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. तर तिसऱ्या सामन्यात त्यांनी युएईवर विजय मिळवला. युएईला या स्पर्धेत दोन पराभव आणि एक विजय मिळाला. तर ओमानला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

Asia Cup 2025 Super 4 Scenario
PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना
Q

एशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानचा विजय कोणावर झाला?

A

पाकिस्तानने युएईवर 41 रन्सने विजय मिळवला.

Q

ग्रुप-ए मधून सुपर-4 मध्ये कोणत्या दोन संघांचा प्रवेश झाला?

A

भारत आणि पाकिस्तान यांचा प्रवेश झाला.

Q

भारत आणि पाकिस्तानमधील पुढील सामना केव्हा होणार आहे?

A

21 सप्टेंबर रविवारी दुबईमध्ये होणार आहे.

Q

भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना किती विकेट्स राखून जिंकला?

A

भारताने 7 विकेट्स राखून सामना जिंकला.

Q

पाकिस्तानने आयसीसीकडे कोणती मागणी केली होती?

A

सामना रेफरी अँडी पायक्रीफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com