Asia Cup 2025
Asia Cup 2025google

Asia Cup 2025: पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर; यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार, नेमकं प्रकरण काय?

Pak vs UAE Pakistan Boycotted Asia Cup after Handshake Row: आशिया कप २०२५ मध्ये आज पाकिस्तान आणि यूएई यांच्यात महत्वाचा सामना खेळला जाणार होता मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानने यूएईविरुद्ध खेळण्यास नकार दिला. या निर्णयामुळे पाकिस्तानचा आशिया कपचा प्रवास आता संपला आहे.
Published on

आशिया कपच्या १० व्या सामन्यात आज पाकिस्तान आणि यजमान संघ यूएई यांच्यात महत्वाचा सामना खेळला जाणार होता, परंतु सामन्याच्या दोन तास आधीच पाकिस्तानी संघानी यूएईशी सामना खेळण्यास नकार दिला आहे. पीसीबीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती. या मागणीला आयसीसीने नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने युएई विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पीसीबीने आज यूएईविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी आपला संघ मैदानात उतरवण्यास नकार दिला. हा सामना आज रात्री ८ वाजता दुबईमध्ये खेळवला जाणार होता, परंतु सामन्याला दोन तास शिल्लक असतना पाकिस्तानी संघ अजूनही हॉटेलमध्ये होता. त्यातच पाकिस्तानी संघाने आजच्या सामन्यावर तसेच आशिया कपवर बहिष्कार टाकल्याची बातमी आता समोर येत आहे.

Asia Cup 2025
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

पाकिस्तान संघ आशियाकपमधून बाहेर

पाकिस्तानी वृत्तसंस्था जियो न्यूजनुसार, पाकिस्तान क्रिकेटे बोर्डाने पाकिस्तान संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमला ​​रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना त्यांच्या हॉटेलमध्ये परतण्याचे आदेश दिले. आशिया कप २०२५ गट अ मधील पाकिस्तान विरुद्ध यूएईचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार होता. परंतु पाकिस्तानी संघाने शेवटच्या क्षणी सामन्यातून माघार घेतली.तर दुसरीकडे, यूएई संघ स्टेडियमला ​​रवाना झाला आहे. पाकिस्तानच्या वॉकओव्हरमुळे यूएई संघाला २ गुण मिळतील, या दोन गुणांमुळे यजमान संघ यूएई थेट सुपर-४ मध्ये प्रवेश करेल.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. पाकिस्तानी संघाने यासाठी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरत त्यांना रेफरी पॅनलमधून काढून टाकण्याची मागणी केली. परंतु आयसीसीने या मागणीला फेटाळून लावले. रेफ्रीला काढून टाकले नाही तर यूएई विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू अशी धमकी पीसीबीने दिली होती. यानंतर, पाकिस्तानने यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार देत आशिया कप २०२५ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Asia Cup 2025
Team India Squad: बलाढ्य संघाचं आव्हान पेलण्यासाठी टीम इंडिया सज्ज; रोहित आणि विराटला संघात स्थान नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com