IND vs PAK Asia Cup: विजयी षटकार मारला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला; पाकिस्तानच्या टीमचा तोंडावर अपमान

Suryakumar Yadav dressing room: भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने विजयाचा षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला, पण त्यानंतर त्याने जे काही केले त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्याने पाकिस्तानच्या संघाचा थेट अपमान करत थेट ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला.
IND vs PAK Asia Cup: विजयी षटकार मारला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला; पाकिस्तानच्या टीमचा तोंडावर अपमान
Published On
Summary
  • भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

  • सूर्यकुमार यादवने नाबाद ४७ धावा केल्या.

  • टॉसपूर्वी सूर्यकुमारने हात मिळवला नाही.

रविवारी झालेल्या आशिया कप 2025 मधील सर्वात मोठ्या सामन्यात भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या धारदार माऱ्यासमोर पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली आणि संपूर्ण टीम केवळ 127 रन्समध्ये गारद झाली.

भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 47 रन्स करत टीमला लक्ष्य सहज गाठून दिलं. 16व्या ओव्हरमध्ये त्याने सिक्स मारत विजयाची नोंद केली. भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकत पाकिस्तानला पाणी पाजलं आहे.

टॉसनंतर हात मिळवला नाही

सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या टॉसच्या वेळी नेहमीप्रमाणे खेळाडू हात मिळवतात. मात्र या वेळी सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी टॉसपूर्वी किंवा त्यानंतर कुठल्याही टप्प्यावर हस्तांदोलन केलं नाही.

IND vs PAK Asia Cup: विजयी षटकार मारला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला; पाकिस्तानच्या टीमचा तोंडावर अपमान
Suryakumar Yadav: सूर्या भाऊनं जिंकली मनं! पाकिस्तानविरोधातील विजय भारतीय सैन्याला समर्पित, नेमकं काय म्हणाला कर्णधार?

सामन्यात संवाद टाळला

भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांची भाषा समजतात आणि नेहमी सामन्यात अधूनमधून गप्पा मारताना दिसतात. पण या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी जवळपास काहीही संवाद साधला नाही.

विजयानंतर सूर्या आणि शिवम थेट ड्रेसिंगरूममध्ये

16व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सूर्यकुमार यादवने विजयी षटकार ठोकला. मात्र विजय मिळताच तो आणि शिवम दुबे थेट ड्रेसिंगरूमकडे चालू लागले. पाकिस्तानच्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करत दोघेही थेट आत गेले. सामान्यतः अशा प्रसंगी दोन्ही संघ एकमेकांशी हस्तांदोलन करून शुभेच्छा देतात. पण भारतीय खेळाडूंनी ठरवून हे न करण्याचा निर्णय घेतला.

IND vs PAK Asia Cup: विजयी षटकार मारला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला; पाकिस्तानच्या टीमचा तोंडावर अपमान
IND vs PAK : भारताने पाकिस्तानला आशिया कपमध्ये पछाडले, ७ गडी राखत मिळवला सहज विजय

ड्रेसिंग रूमचा दरवाजा केला बंद

भारतीय खेळाडू मैदानावर परत येण्याऐवजी ड्रेसिंगरूममध्ये आनंद साजरा करत राहिले. सूर्या आणि शिवमचे सहकारी त्यांचं स्वागत करत होतं. पण पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर हात मिळवण्यासाठी उभेच राहिले. भारतीय खेळाडूंनी एकमेकांतच अभिनंदन करून ड्रेसिंगरूमचे दरवाजे बंद केला.

IND vs PAK Asia Cup: विजयी षटकार मारला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला; पाकिस्तानच्या टीमचा तोंडावर अपमान
India vs Pakistan : भारतीय गोलंदाजांनी फिरकीचा फास आवळला, पाकिस्तान संघाचा किल्ला कोसळला, टीम इंडियाला किती धावांचे आव्हान?

गंभीरने दिलं स्पष्ट कारण

सामन्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत याबाबत स्पष्टीकरण दिलं. गंभीर म्हणाला, "एक टीम म्हणून आम्हाला पहलगाम हल्ल्यात पीडित कुटुंबांप्रती एकजूट दाखवायची होती. तसंच आमच्या सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यामुळेच पाकिस्तानच्या खेळाडूंशी कोणतेही मैत्रीपूर्ण वर्तन न करण्याचा निर्णय घेतला."

IND vs PAK Asia Cup: विजयी षटकार मारला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला; पाकिस्तानच्या टीमचा तोंडावर अपमान
IND vs PAK : पाकिस्तानचा सुपर फलंदाज 'सुपर फ्लॉप'! बुमराहला 6 षटकार मारणार होता पण पहिल्या चेंडूवर पडली विकेट, पाहा Video
Q

आशिया कप २०२५ मध्ये भारताचा पाकिस्तानवर किती गडी राखून विजय झाला?

A

भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

Q

सूर्यकुमार यादवने किती धावा करून विजयी षटकार लगावला?

A

सूर्यकुमार यादवने ४७ धावा करून विजयी षटकार लगावला

Q

टॉसपूर्वी कोणत्या दोन कर्णधारांमध्ये हस्तांदोलन झाले नाही?

A

सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांच्यात हस्तांदोलन झाले नाही.

Q

सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी काय केले?

A

पाकिस्तानी खेळाडूंशी संवाद न ठेवता ड्रेसिंगरूममध्ये जाऊन दरवाजे बंद केले.

Q

भारतीय टीमने पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण वर्तन का टाळले?

A

पहलगाम हल्ल्यातील पीडितांना आणि सैन्याला समर्पित करण्यासाठी टाळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com