
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानची फलंदाजी कोसळली.
पाकिस्तानने २० षटकांत ९ गडी गमावून १२७ धावा केल्या
आशिया कप स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धक टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली आहे. जलद गोलंदाज आणि फिरकीपटूपुढे पाकिस्तान संघाचा किल्ला कोसळला. पाकिस्तानने भारताला जिंकण्यासाठी २० षटकात अवघ्या १२८ धावांचं आव्हान दिलं.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १२७ धावा कुटल्या. पाकिस्तानसाठी फरहानने सर्वाधिक ४० धावा कुटल्या. तर भारतासाठी कुलदीप यादवने तीन , अक्षर-बुमरहाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
पाकिस्तानच्या फलदांजीची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने पहिल्याच चेंडूत सईम अयूबला बाद केलं. हार्दिक पंड्याने अयूबला बाद केलं. दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने मोहम्मद हारिलला ३ धावांवर बाद केलं. तर फखर जमाने १५ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. कर्णधार सलमान अली आगा १२ चेंडूत केवळ ३ धावा करून बाद झला. अक्षर पटेलने सलमानला बाद केलं. पुढे कुलदीपने हसन नवाजला बाद केलं.
कुलदीपने मोहम्मद नवाजलाही बाद केलं. पाकिस्तानचा सलामीवर फरहान ४४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. वरुण चक्रवर्तीने फहीम अशरफला बाद केलं. त्याने १४ चेंडूत ११ धावा केल्या.
आशिया कप स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात यूएईला ९ विकेटने पराभूत केलंय. तर पाकिस्तानने ओमान संघाला ९३ धावांनी पराभूत केलं. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामने जिंकले आहेत. आजचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला सुपर ४ मध्ये एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आजच्या सामन्याकडे लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.