Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

India loses toss again vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात पुन्हा एकदा नशिबाने भारताची साथ सोडली आहे. कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा टॉस गमावला.
India loses toss again vs Australia
India loses toss again vs Australiasaam tv
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० सिरीजमधील चौथा सामना गुरुवारी क्वीन्सलँडमधील कॅरेरा ओव्हलमध्ये खेळवला जातोय. टीम इंडिया या सिरीजमध्ये २-१ अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला होता. मात्र या सामन्यात पुन्हा एकदा भारताने टॉस गमावला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये ४ मोठे बदल

चौथा टी-२० सामना जिंकण्याचा ऑस्ट्रेलिया टीमचाही निर्धार असणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने ४ मोठे बदल केले आहेत. यावेळी अॅडम झॅम्पा, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस आणि जोश फिलिप यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडियामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

India loses toss again vs Australia
Rohit Sharma-Virat Kohli : 'रो-को'ला ब्रेक! रोहित शर्मा, विराट कोहलीचं कमबॅक लांबणीवर, मोठी अपडेट आली

सिरीज १-१ अशी बरोबरीत

या सिरीजमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना कॅनबैरामध्ये खेळवण्यात आला होता. त्यानंतर मेलबर्नमध्ये झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि त्यानंतर तिसरा सामना टीम इंडियाने ५ विकेट्सने जिंकला.

कशी आहे दोन्ही टीमची प्लेईंग ११

ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टीम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा.

India loses toss again vs Australia
India A Squad : वनडे संघात रोहित शर्मा, विराट कोहलीला स्थान नाही; इंडिया ए संघाची घोषणा, तिलक वर्मा कॅप्टन

भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

India loses toss again vs Australia
IND vs AUS : हेड आज संघाबाहेर, भारताच्या संघात बदल होणार? पाहा प्लेईंग ११ मध्ये कुणाला संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com