

वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय टीमने इतिहास घडवलाय. रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने असा रेकॉर्ड केलाय की, जो गेल्या जवळपास 150 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही टीमला करता आलेला नाही. भारताच्या फलंदाजांनी एकाच डावात पहिल्या विकेटपासून सातव्या विकेटपर्यंत सलग सात अर्धशतकी पार्टनरशिप झाल्या. म्हणजेच प्रत्येक पार्टनरशिपमध्ये फलंदाजांनी मिळून किमान 50 रन्स केले.
न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 रन्स केले आहेत. याला उत्तर देताना भारतीय फलंदाजांनी 720 रन्सचा टप्पा पार करत मोठी धावसंख्या उभी केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय.
वेलिंग्टनच्या मैदानावर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केली. ओपनिंगच्या जोडीपासून ते मिडल ऑर्डरपर्यंचय्या फलंदाजांपर्यंत प्रत्येकाने चांगली खेळी केली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही टीमने पहिल्या विकेटपासून सलग सात अर्धशतकी पार्टनरशिप केल्या नव्हत्या.
या सामन्यात आणखी एक खास रेकॉर्ड झाला. भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात परदेशातील मैदानावर पहिल्या पाच फलंदाजांनी एकाच डावात प्रत्येकी 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. ओपनर केएल राहुलने 136 रन्स केले तर यशस्वी जयस्वालने 85 रन्सची खेळी केली. त्यानंतर शुभमन गिलने 90 आणि देवदत्त पडिक्कलने 80 रन्स करत भारताचा स्कोर पुढे नेला.
भारताच्या मोठ्या स्कोरमध्ये केएल राहुलचा मोठा वाटा होता. राहुलने 290 चेंडूंचा सामना करत 136 रन्सची खेळी केली. या शतकासह त्याने आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चारही देशांमध्ये टेस्ट शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ओनपर ठरलाय.
यानंतर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी केली. त्याने 128 रन्सची शतकी खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव वाढवला. त्यानंतर ध्रुव जुरेलने 78 रन्स केले. त्याने खालच्या फळीतील फलंदाजांसोबत चांगली साथ दिली. सातव्या विकेटसाठीही अर्धशतकी भागीदारी झाल्याने भारताच्या सलग सात अर्धशतकी पार्टनरशिपच्या रेकॉर्डवर शिक्कामोर्तब झालं.
एकाच टेस्ट डावात सर्वाधिक अर्धशतकी पार्टनरशिप करण्याचा विक्रमही टीम इंडियाच्याच नावावर आहे. 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानावर भारताने एकाच डावात आठ अर्धशतकी पार्टनरशिप केली होती. दरम्यान पहिल्या डावात 350 पेक्षा जास्त रन्सची मोठी आघाडी घेतल्यामुळे भारताची स्थिती आता मजबूत झालीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.