Henry Nicholls: हेन्री निकोल्सचा ऐतिहासिक विक्रम! भारताविरुद्ध 175 रन्सची नाबाद खेळी करत मोडला 36 वर्षांचा रेकॉर्ड

Henry Nicholls Record: भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात हेन्री निकोल्सने नाबाद 175 धावांची खेळी करत 36 वर्षांपूर्वीचा अँड्र्यू जोन्सचा विक्रम मोडला. निकोल्सने टेस्ट कारकिर्दीतील 12 वे शतक झळकावले. ग्लेन फिलिप्ससोबतच्या मोठ्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला संकटातून सावरत मोठी धावसंख्या उभारता आली.
Henry Nicholls Record
Henry Nicholls Recordsaam tv
Published On: 

वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जातोय. या सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज हेन्री निकोल्सने त्याच्या तुफान फलंदाजीने मोठा रेकॉर्ड केला आहे. भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आता निकोल्सच्या नावावर झालाय. त्याने तब्बल 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

हेन्री निकोल्सने मोडला 36 वर्षांपूर्वीचा विक्रम

न्यूझीलंडचा माजी फलंदाज अँड्र्यू जोन्स याच्या नावावर हा रेकॉर्ड होता. फेब्रुवारी 1990 मध्ये ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर भारताविरुद्ध खेळताना त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यावेळी जोन्सने 335 चेंडूंचा सामना करत नाबाद 170 रन्स केले होते.

Henry Nicholls Record
Jasprit Bumrah bowling: बुमराहच्या 'मास्टरक्लास' चेंडूवर टॉम लॅथम चक्रावला, बॉल सोडला अन् थेट क्लिन बोल्ड, पाहा Video

तर आता हेन्री निकोल्सने हा रेकॉर्ड मोडलाय. त्याने 335 चेंडूंमध्ये 21 चौकारांच्या मदतीने नाबाद 175 रन्स केले. या खेळीसह भारताविरुद्ध टेस्ट सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 150 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स करणारा निकोल्स हा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरलाय.

भारताविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक रन्स करणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांमध्ये आता हेन्री निकोल्स (175*) आणि अँड्र्यू जोन्स (170*) यांच्यानंतर जॉन रीड (1981 मध्ये 123*), स्कॉट स्टायरिस (2003 मध्ये 119) आणि केन विलियम्सन (2014 मध्ये 113) यांचा समावेश आहे.

Henry Nicholls Record
Shubman Gill: पहिल्याच टेस्टमध्ये ड्रामा; अंपायरच्या निर्णयाने शुभमन गिलचा पारा चढला! नेमकं काय घडलं?

निकोल्सचे कारकिर्दीतील 12वं टेस्ट शतक

गुरुवारी हेन्री निकोल्सने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील 12वं शतक पूर्ण केलंय. त्याच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला मोठा स्कोर करणं शक्य झालं आहे.

न्यूझीलंडची अवस्था सुरुवातीला अत्यंत खराब होती. टीमने अवघ्या 70 रन्सवर पाच विकेट्स गमावले होते. अशा वेळी निकोल्सने ग्लेन फिलिप्ससोबत डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 394 चेंडूंमध्ये 216 रन्सची मोठी पार्टनरशिप केली. ग्लेन फिलिप्सने 216 चेंडूंचा सामना करत 118 रन्स केले. या पार्टनरशिपमुळे न्यूझीलंडला 300 रन्सचा टप्पा पार करता आला.

भारताविरुद्ध सर्वाधिक रन्सचा विक्रम ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर

भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम अजूनही माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये याच बेसिन रिझर्व्ह मैदानावर मॅक्युलमने भारताविरुद्ध 559 चेंडूंचा सामना करत 302 रन्सची ऐतिहासिक खेळी केली होती.

Henry Nicholls Record
ICC Fine on India: विजयानंतर टीम इंडियाला ICC चा मोठा झटका; खेळाडूंच्या मानधनातून कापली जाणार इतकी मोठी रक्कम, नेमकं काय घडलं?

मॅक्युलमने भारताविरुद्ध दोन द्विशतकंही झळकावली आहेत. त्याने 225 आणि 224 रन्सच्या खेळी केल्या होत्या. याशिवाय ग्राहम डाउलिंग यांनी 1968 मध्ये 239 रन्स, बर्ट सटक्लिफ यांनी 1955 मध्ये नाबाद 230 रन्स, तर जेसी रायडरने 2009 मध्ये 201 रन्सची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.