ICC Fine on India: विजयानंतर टीम इंडियाला ICC चा मोठा झटका; खेळाडूंच्या मानधनातून कापली जाणार इतकी मोठी रक्कम, नेमकं काय घडलं?

Team India Penalised: न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या वनडेत २२ धावांनी विजय मिळवून भारताने मालिका ३-१ ने जिंकली. मात्र, स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने भारतीय खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून ३५ टक्के दंड आकारण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यरने हा दंड स्वीकारला.
ICC Fine on India
ICC Fine on Indiasaam tv
Published On: 

न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा वनडे सामना जिंकून भारतीय टीमने सिरीज आपल्या नावावर केली. पण या विजयानंतरही टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने टीम इंडियाला दंड ठोठावला आहे. 15 नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय टीमने ओव्हर्स टाकण्यासाठी जास्त वेळ घेतला. यामुळे टीममधील खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून 35 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय ICC ने घेतलाय.

ICC च्या माहितीनुसार, टीम इंडियाला ठरलेल्या वेळेत संपूर्ण ओव्हर्स पूर्ण करता आली नाहीत. टीमने तब्बल 7 ओव्हर्स कमी टाकली होती. नियमांनुसार, मिळणारा अतिरिक्त वेळ धरूनही टीम इंडियाला वेळेत गोलंदाजी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ICC Fine on India
Shubman Gill: पहिल्याच टेस्टमध्ये ड्रामा; अंपायरच्या निर्णयाने शुभमन गिलचा पारा चढला! नेमकं काय घडलं?

ठरलेल्या वेळेपेक्षा 7 ओव्हर्स कमी टाकले

ICC च्या नियमानुसार, एखाद्या टीमला ठरलेल्या वेळेत सर्व ओव्हर्स पूर्ण करता आल्या नाहीत तर प्रत्येक कमी पडलेल्या ओव्हर्ससाठी खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून 5 टक्के रक्कम कापली जाते. या नियमानुसार एखाद्या खेळाडूला जास्तीत जास्त 50 टक्के दंड होऊ शकतो.

पाचव्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 7 ओव्हर्स कमी टाकल्या होत्या. त्यामुळे खेळाडूंच्या मानधनातून एकूण 35 टक्के रक्कम कापली जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची धुरा सांभाळणाऱ्या श्रेयस अय्यरने सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी दिलेला दंड मान्य केलाय. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी घेण्याची गरज पडली नाही.

ICC Fine on India
Jasprit Bumrah bowling: बुमराहच्या 'मास्टरक्लास' चेंडूवर टॉम लॅथम चक्रावला, बॉल सोडला अन् थेट क्लिन बोल्ड, पाहा Video

पाचव्या वनडेत भारताने 22 रन्सने मिळवला होता विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या वनडे सामन्यात भारतीय टीमला सुरुवातीला धक्के बसले होते. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करत टीमला सावरलं. ईशान किशन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 46 रन्सची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 209 रन्सपर्यंत मजल मारता आली.

यानंतर भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. त्यांनी न्यूझीलंडच्या संपूर्ण टीमला 187 रन्सवर रोखलं. अशाप्रकारे भारताने हा सामना 22 रन्सने जिंकला.

ICC Fine on India
Team India: रोहित-विराटचा न्यूझीलंडमधील शेवटचा वनडे सामना; चाहत्यांचे आभार मानताना दिग्गज भावूक, पाहा Video

भारताने टी-20 आणि वनडे सिरीज जिंकली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकले होते. त्यानंतर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला. त्यामुळे सिरीजमध्ये 2-1 अशी स्थिती होती. पण पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने विजय मिळवत ही सिरीज 3-1 ने जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.