Ind vs NZ : टीम इंडियानं 'करून दाखवलं'! ९४ वर्षांत पहिल्यांदाच विक्रमाला गवसणी

Ind vs NZ test match india creates record on foreign soil : न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी एकाच डावात ५० किंवा त्याहून अधिक धावा करून विदेशी भूमीत इतिहास रचला. भारताकडून पहिल्यांदाच असा विक्रम झाला.
टीम इंडियाने ९४ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये केला ऐतिहासिक विक्रम
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी केली. BCCI - X
Published On: 

team india creates historic test record after 94 years against new zealand : न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्यात देशात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं याआधी कधीच घडलं नव्हतं. वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे भारत-न्यूझीलंड कसोटी सामना सुरू आहे. या पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी एकाच डावात ५० किंवा त्याहून अधिक धावा करून इतिहास रचला आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या ९४ वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. विदेशी भूमीत कसोटी सामन्याच्या एका डावात भारताच्या आघाडीच्या पाचही फलंदाजांनी अर्धशतक झळकावले.

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडला पहिल्या डावात ३६८ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ४ गडी गमावून ४८६ धावा केल्या होत्या. केएल राहुलने शतक झळकावले. यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतके ठोकली.

विदेशी भूमीवर पहिल्यांदाच विक्रम

एका डावात आघाडीच्या पाच फलंदाजांनी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याची भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही पाचवी वेळ आहे. पण विदेशातील मैदानावर असं पहिल्यांदाच घडलं आहे. याआधी चार वेळा भारतानं मायदेशातील मैदानावर ही किमया केली आहे. वेलिंग्टन कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावा जोडल्या. जयस्वाल हा ८९ चेंडूंत ८५ धावा करून बाद झाला. राहुलने २९० चेंडूंत १३६ धावा केल्या.

पडिक्कलही चमकला

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरलेल्या देवदत्त पडिक्कलनेही संयमी खेळी केली. १७५ चेंडूंत ८० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल यानं डाव सांभाळला. त्याचं शतक हुकलं. तो ९८ धावांवर बाद झाला. अखेरच्या सत्रात ऋषभ पंतनं अर्धशतक पूर्ण केलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा तेव्हा तो ५५ धावांवर नाबाद होता.

टीम इंडियाने ९४ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये केला ऐतिहासिक विक्रम
IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडच्या मैदानावर 32 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने रचला इतिहास!

केएल राहुलची कमाल

केएल राहुलनं आपल्या १३६ धावांच्या खेळीत आणखी एक मोठा टप्पा गाठला. तो न्यूझीलंडच्या भूमीवर आपल्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी सुनील गावस्कर आणि अमरनाथ यांनी १९७६ मध्ये ऑकलंडच्या ईडन पार्कवर आपल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अनुक्रमे ११६ आणि १२४ धावा केल्या होत्या.

टीम इंडियाने ९४ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये केला ऐतिहासिक विक्रम
Team India: रोहित-विराटचा न्यूझीलंडमधील शेवटचा वनडे सामना; चाहत्यांचे आभार मानताना दिग्गज भावूक, पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.