IND vs PAK women: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी; कुठे पाहता येणार सामना?

India Pakistan women cricket: महिला आशिया कप 2026 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. सामना किती वाजता सुरू होईल, कुठे रंगणार आणि LIVE कुठे पाहता येईल? जाणून घ्या सामन्याची संपूर्ण माहिती.
IND vs PAK women
IND vs PAK womensaam tv
Published On

आज क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीममध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. महिला आशिया कप 2026 मध्ये दोन्ही टीम शनिवारी आमनेसामने येणार आहेत. ग्रुप स्टेजमधील हा शेवटचा सामना असणार आहे. टीम इंडियाने आधीच सेमीफायनलमध्ये एन्ट्री केलीये. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून ग्रुप स्टेजचा शेवट करण्याचे टीम इंडियाचं लक्ष्य असणार आहे.

महिला आशिया कप 2026 ची सुरुवात दुबईमध्ये झाली. या स्पर्धेत एकूण 8 टीम्स सहभागी झाल्या असून सर्वच संघांचं लक्ष्य टी-20 आशिया कप जिंकण्याचं आहे. ही स्पर्धा 13 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून ग्रुप स्टेज, दोन सेमीफायनल आणि अंतिम सामना असे एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत.

IND vs PAK women
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा मोठा विक्रम! शतक ठोकत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली

भारतीय टीमचा समावेश ग्रुप ‘A’ मध्ये करण्यात आला आहे. या गटात भारतासोबत पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग आणि चीनची टीम्स आहेत. त्यामुळे ग्रुप स्टेजमधील भारताचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

भारताने आपल्या मागील सामन्यात हाँगकाँगचा तब्बल 137 रन्सने पराभव केला. या विजयात ओपनर स्मृती मंधानाची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. मंधानाने अवघ्या 64 चेंडूंत 124 रन्सची तुफानी खेळी केली. मंधानाच्या या खेळीमुळे भारताला मोठा विजय मिळालाच, पण तिच्या नावावर एक मोठा विक्रमही जमा झाला. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज म्हणून मंधानाने नवा विक्रम केला.

IND vs PAK women
बीसीसीआयची मोठी कारवाई; रोहितवर २ वर्षांची बंदी; टीम इंडियाच्या अंडर १९ मध्ये झालं होतं सिलेक्शन

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची संपूर्ण माहिती

  • तारीख- 5 सप्टेंबर 2026, शनिवार

  • वेळ- रात्री 8 वाजता

  • ठिकाण- दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई

  • सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान

  • स्पर्धा- महिला आशिया कप 2026

  • टप्पा- ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना

सामना LIVE कुठे पाहता येणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Sports Network वर केलं जाणार आहे. त्यामुळे टीव्हीवर सामना पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना Sony Sports च्या चॅनेलवर सामन्याचा थेट आनंद घेता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर डिजिटल माध्यमांवर सामना पाहायचा असल्यास Sony LIV वर सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com