सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर T20मालिका खेळत आहे. पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. आज दुसरा टी-२० सामना ग्केबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावाच्या शेवटी वरुणराजाने व्यत्यय आणला. भारतीय संघाच्या फलंदाजीचा डाव चालू असताना १९ व्या षटकात पाऊस सुरू झाला. भारताने १९ षटकापर्यंत १८० धावा केल्या होत्या. परंतु पावसामुळे खेळ थांबवण्यात आल्यामुळे धावांची संख्या कमी करण्यात आली. क्रिकेटच्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. (Latest News)
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी तडाखेबाज फलंदाजी करत आपला जलवा कायम ठेवला. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात थोडी खराब राहिली. सुरुवातीच्या काही षटकातच टीम इंडियाला धक्के बसले. १० षटकांचा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचे तीन गडी गमावत ८० धावा केल्या होत्या. सुरुवातीलाच विकेट गेल्यामुळे संघावर काहीसा दबाव होता.
परंतु मैदानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार स्फोटक फलंदाजी करत 36 चेंडूत 56 धावा केल्या. यावेळी त्याला रिंकू सिंगने साथ लाभली. रिंकूने भारतीय मैदानात दाखवलेला जलवा कायम ठेवत आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. रिंकूने रिंकू सिंगने शानदार फलंदाजी करत 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं. कर्णधार सूर्यकुमार आणि रिंकूच्या तडाखेबाजी फलंदाजीमुळे भारतीय संघाने धावा करत आफ्रिकेसमोर धावांचे आव्हान ठेवले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.