India names squad for U19 CWC: आयसीसी २०२४ विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूकडं संघाचं नेतृत्व

India squad for U19 CWC: पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा विश्वचषक खेळला जाणार आहे. आयसीसीचा हा विश्वचषक हा १९ वर्षांखालील संघासाठी असणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या U-19 संघाची घोषणा केली आहे.
India names squad for U19 CWC
India names squad for U19 CWCSaam tv
Published On

India names squad for U19 World Cup :

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा विश्वचषक खेळला जाणार आहे. आयसीसीचा हा विश्वचषक हा १९ वर्षांखालील संघासाठी असणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या U-19 संघाची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाच्या १९ वर्षाखालील संघाला वनडे विश्वचषकाआधी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशी तीन संघात मालिका खेळावी लागणार आहे. ही त्रिकोणी मालिका २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मालिकेचा शेवटचा सामना १० जानेवारी २०२४ रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर १९ वर्षाखालील विश्वचषकाची सुरुवात १९ जानेवारीपासून सुरुवात आहे. या विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना २० जानेवारी रोजी होणार आहे.

India names squad for U19 CWC
Cricket News : द्रविड शून्यावर बाद, तर सेहवागचं अर्धशतक; स्कोअर बोर्डवर अनेक वर्षांनी झळकली दिग्गजांची नावे

19 वर्षांखालील वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघ :

उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी, अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र पटेल, सचिन धस, सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, प्रियांशू मोलिया, मुशीर खान

India names squad for U19 CWC
U19 World Cup 2024 : ICC कडून अंडर-१९ पुरुष क्रिकेट वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचा पहिला सामना कधी असेल?

तत्पूर्वी, १५ जणांचा संघ आणि तीन ट्रॅव्हलिंग स्टँडबॉय व्यतिरिक्त बीसीसीआयने चार जणांना राखीव ठेवले आहेत. यात महाराष्ट्राचा दिग्विजय पाटील,हरियाणाचा जयंत गोयत, तामिळनाडूचा के पी विगनेश आणि महाराष्ट्राचा किरण चोरमाळे याचा सामावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com