U19 World Cup 2024 : ICC कडून अंडर-१९ पुरुष क्रिकेट वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचा पहिला सामना कधी असेल?

U19 World Cup 2024 Schedule: पुरुषाच्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या क्रिकेट संग्रामाची सुरुवात १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. या संग्रमात ४१ सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघ २० जानेवारीला आपला पहिला सामना खेळणार आहे.
U19 World Cup 2024
U19 World Cup 2024Saam Tv Twitter X
Published On

U19 Men's World Cup 2024 Schedule Announces:

पुरुषाच्या अंडर१९ क्रिकेट वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. ICC ने सोमवारी संध्याकाळी अंडर- १९ वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. १९८८ पासून अंडर-१९ च्या वर्ल्डकपचे आयोजन केले जाते. १९८८ पासून दर दुसऱ्या वर्षी हे या सामन्यांचे आयोजन केले जाते. यंदा दक्षिण आफ्रिकेत अंडर-१९ वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. हे सर्व सामने येथील पाच मैदानांवर खेळवले जाणार आहेत. (Latest News)

ग्रुप स्टेजमधील फेरीत भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशसोबत २० जानेवारीला होणार आहे. तर दुसरा सामना २५ जानेवारीला आयर्लंडशी आणि तिसरा सामना २८ जानेवारीला अमेरिकेच्या विरुद्धात होणार आहे. अंडर-१९च्या वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडियाने पाचवेळा विजेतेपद घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाला तीनदा तर पाकिस्तानला दोनदा हे विजेतेपद मिळाले आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद घेतलंय.

असे होतील सामने

या वर्ल्डकपमध्ये चार गट करण्यात आले आहेत. या गटात चार संघ ठेवण्यात आले असून प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. चारही गटांतील अव्वल ३ संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. म्हणजेच दुसऱ्या फेरीत एकूण १२ संघ असतील.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यात प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील दोन संघांसह प्रत्येकी एक सामना खेळतील. म्हणजेच या फेरीत प्रत्येक संघाचे दोन सामने होतील. यानंतर टॉप-४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. सेमीफायनल आणि फायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

U19 World Cup 2024
World Cup 2023: वर्ल्डकपसाठी दिग्गजाने निवडला भारतीय संघ! संघातील या २ प्रमुख खेळाडूंना ठेवलं संघाबाहेर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com