

टी-२० वर्ल्ड कप २०२६ फायनलमध्ये अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला.
हा प्रकार न्यूझीलंडच्या डावाच्या ११ व्या षटकात घडला.
अर्शदीपने मिशेलच्या दिशेने चेंडू फेकल्यामुळे वाद वाढला.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून २५५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. त्यांचा निम्मा संघ ७२ धावांवर परतला होता.
न्यूझीलंडच्या डावाच्या ११ व्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. क्षेत्ररक्षण करताना अर्शदीप सिंगने अचानक मिशेलकडे चेंडू थेट फेकला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
अर्शदीप सिंगला डावाच्या ११ व्या षटकाची जबाबदारी देण्यात आली. मिशेल सँटनरने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. तर डॅरिल मिशेलने अर्शदीपच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारले. चौथा चेंडू वाईड होता, त्यानंतर अर्शदीप सिंगच्या चौथ्या चेंडूवर मिशेलने एक्स्ट्रा कव्हरकडे खेळला पण त्याला धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूवर मिशेलने ऑफ स्टंपच्या बाहेर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट अर्शदीप सिंगकडे गेला.
. त्यानंतर त्याने थ्रो मिशेलकडे फेकला. त्यानंतर संतापलेल्या मिचेलने अर्शदीप सिंगशी वाद घातला. मिशेलचा राग पाहून टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला दोघांमध्ये हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर मैदानावरील पंच अर्शदीप सिंगशी बोलले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.