Ind vs NZ T20 Final: भारताने इतिहास रचला! सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर कोरलं नाव; किवींचा पराभव करत तिसऱ्यांदा जिंकला विश्वचषक

Historic Win! India Beats New Zealand : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयासह, टीम इंडियाने तिसरे टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले .
Historic Win! India Beats New Zealand :
Historic Win! India Beats New Zealand :
Published On

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात होत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारताने न्युझीलंडसमोर २५६ धावांचे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचे पाठलाग करताना किवीच्या फलंदाजांना नाकीनऊ आले. भारतीय गोलंदाजांनी किवीच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी शानदार गोलंदाजी केली. बुमराहने ४ विकेट घेतल्या.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा एकदा विजेतेपद मिळवले आहे. भारत जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनलाय. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी दोनदा ट्रॉफी जिंकली आहे.

Historic Win! India Beats New Zealand :
टी20 वर्ल्डकप जिंकलो रे...! टीम इंडियाच्या विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी; स्टेडियमपासून गावागावात क्रिकेटप्रेमींचा जल्लोष

भारत हा सलग दोन वेळा विजेतेपद जिंकणारा जगातील पहिला देश ठरला आहे. टीम इंडियाने ही कामगिरी केली. इतर कोणत्याही देशाने घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकलेला नाहीये. मात्र सूर्यकुमारच्या सैन्यानेही हे साध्य केले. २००७ आणि २०२४ मध्ये भारताने विजेतेपद जिंकले. २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता आणि २०२४ मध्ये रोहित शर्मा कर्णधार होता. योगायोगाने दोन्ही दिग्गजांनी या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार बनले. दोन्ही दिग्गज टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Historic Win! India Beats New Zealand :
IND vs NZ Final: सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी; सूर्यादादा तिसऱ्यांदा 'गोल्डन डक', अंतिम सामन्यातील कर्णधारांचा इतिहास कायम

टी-२० विश्वचषक जिंकणारे देश

भारत - २००७, २०२४, २०२६

इंग्लंड - २०१०, २०२२

वेस्ट इंडिज - २०१२, २०१६

पाकिस्तान - २००९

श्रीलंका - २०१४

ऑस्ट्रेलिया - २०२१

सॅमसन आणि अभिषेकने आक्रमक खेळी

अहमदाबादमध्ये १,००,००० हून अधिक प्रेक्षकांसमोर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी केली. सुरुवातीला खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होती आणि भारतीय सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी याचा फायदा घेत ७.१ षटकांत ९८ धावांची भागीदारी केली. अभिषेकने स्पर्धेतील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. २१ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ५२ धावा काढून बाद झाला.

इशान किशन आणि सॅमसनचा धमाका

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर सॅमसनला इशान किशनने साथ दिली. दोघांनी किवींची धुलाई चालू ठेवली. दुसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १०५ धावांची भागीदारी केली. पण या ही सामन्यात संजू सॅमसनचं शतक हुकलं. तो ४६ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला. सॅमसनचे हे सलग तिसरे शतक होते. यापूर्वी, त्याने सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७ आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८९ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com