टी20 वर्ल्डकप जिंकलो रे...! टीम इंडियाच्या विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी; स्टेडियमपासून गावागावात क्रिकेटप्रेमींचा जल्लोष

team india t20 world cup : टीम इंडियाच्या विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी केली. टीम इंडियाच्या विजयानंतर स्टेडियमपासून गावागावात क्रिकेटप्रेमींचा जल्लोष केला.
team india news
team india t20 world cup Saam tv
Published On

गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात केली आहे. टीम इंडियाने ९६ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना १५९ धावांमध्ये गुंडाळले. सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींकडून विजयाचा जल्लोष केला जात आहे.

मावळमध्ये भारत टी२० वर्ल्डकप जिंकताच केला एकच जल्लोष

टीम इंडियाने टी२० वर्ल्डकप मावळच्या शिरगावमध्ये स्क्रीन लावून सर्व नागरिकांना मॅच बघून आनंद घेण्यासाठी अभिमान सोसायटीच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. भारत विरुद्ध इंग्लंड टी२० वर्ल्डकप बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेकडो क्रिकेटप्रेमींना येथे हजेरी लावली होती. भारत जिंकताच फटाकेची आतिषबाजी करत एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी महिलांनी अतिशय आनंद व्यक्त करत फटाक्यांची अतिषबाजी केली.

team india news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढणार; राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, मनसैनिक उद्यापासून कामाला लागणार

धुळेकरांचा जल्लोष

टी२० विश्वकप भारताने जिंकल्यानंतर धुळेकरांनी जल्लोष केला. फटाके फोडत आणि नाचून जल्लोष साजरा केला. गेल्या कित्येक वर्षांची भारताची प्रतीक्षा संपली आहे.

रत्नागिरीकरांनी वाटले पेढे

रत्नागिरीकरांनी विजयानंतर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष व्यक्त केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि भारताचा झेंडा घेऊन क्रिकेटप्रेमींनी जल्लोष व्यक्त केला. रत्नागिरीकरांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

team india news
अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या मधल्या फळीचा फ्लॉप शो; एकाच षटकात ३ फलंदाज बाद

नागपुरात तरुण एकवटले

भारत विश्वविजेता झाल्यानंतर नागपुरातील लक्ष्मीभवन चौकात जल्लोष सुरू केला. तरुणांनी हातात तिरंगा घेत जल्लोष सुरू केला. तरुणांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केलं.

छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रिकेटप्रेमींचा आनंद

छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात विश्वचषक विजयाचा आनंद जल्लोषात साजरा करण्यात आला. फटाके फोडून घोषणाबाजी करीत छत्रपती संभाजीनगरकरांनी जल्लोष साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com