Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी दिग्गज खेळाडूकडून टीम इंडियाची घोषणा; या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

Brian Lara Team India Prediction For T20 World Cup 2024: येत्या १ जूनपासून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी ब्रायन लारा यांनी भारतीय संघाची निवड केली आहे.
ICC T20 World cup 2024 brian lara picked team india squad for upcoming t20 world cup amd2000
ICC T20 World cup 2024 brian lara picked team india squad for upcoming t20 world cup amd2000twitter

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी वेस्टइंडीजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांनी भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात त्यांनी रोहित शर्माची निवड केली असून युवा आणि अनुभवी खेळाडूंना स्थान दिलं आहे. या १५ सदस्यीय संघात विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तर मयांक यादव आणि यशस्वी जयस्वालसारख्या युवा खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणाला स्थान मिळणार?हा तिढा सुटायचं काही नाव घेत नाहीये. ब्रायन लारा यांनी आपल्या संघात संजू सॅमसन आणि रिषभ पंतची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी शिवम दुबे,हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजाला संघात स्थान दिलं आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या जोडीला पसंती दिली आहे. यासह वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा आणि मयांक यादवला संघात स्थान दिलं आहे.

ICC T20 World cup 2024 brian lara picked team india squad for upcoming t20 world cup amd2000
MS Dhoni Record: एमएस धोनीने रचला इतिहास! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध रंगणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे.

ICC T20 World cup 2024 brian lara picked team india squad for upcoming t20 world cup amd2000
IPL 2024 Points Table: चेन्नईची टॉप ३ मध्ये धडक! हैदराबादसह या संघांचं टेन्शन वाढलं

असा आहे ब्रायन लारा यांनी निवडलेला १५ सदस्यीय भारतीय संघ:

रोहित शर्मा ( कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन ( यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा, मयांक यादव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com